Datta Bharne : ''शांत झोप लागत नसेल तर...'', दत्ता भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंदापूर विधानसभा मतदार संघात दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीत दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा दारूण पराभव केला होता. दत्ता भरणे हे 20 हजार मतांनी विजयी ठरले होते.
Datta Bharne Slam Harshvardhan Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांचे आमदार दत्ता भरणे यांनी महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर जबरदस्त टोला लगावला आहे. हर्षवर्धन पाटील भापजात असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकांपुर्वी त्यांनी भाजपात आल्यापासून शांत झोप लागतेय असे विधान केले होते. या विधानामुळे ते प्रचंड चर्चेत आले होते. आता याच विधानाला धरून दत्ता भरणे यांनी शांत झोप लागत नसेल तर महायुतीत स्वागत आहे, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.
दत्ता भरणे झी 24 तासशी बोलत होते. यावेळी हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर दत्ता भरणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शेवटी राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचं त्यांना अभिनंदन करावस वाटलं असेल, यासाठी कदाचित ते गेले असतील.त्यामुळे निवडणुकीपुरतच राजकारण करायचं असतं त्यानंतर ते बाजूला सोडायंच असतं. तसेच वैयक्तिक संबंध हे जपायचे असतात, म्हणून त्यांनी ही भेट घेतली असेल, असे दत्ता भरणे यांनी म्हटलं आहे. तसेच शांत झोप लागत नसेल तर महायुतीत स्वागत आहे,अशा शब्दात दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला हाणला आहे.
advertisement
शेवटी विजय पण पचवता आले पाहिजे, पराभव पण पचवता आला पाहिजे.इंदापूरची जनता आमची सुज्ञ आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या जीवावर माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून आला आहे, असे दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान इंदापूर विधानसभा मतदार संघात दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीत दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा दारूण पराभव केला होता. दत्ता भरणे हे 20 हजार मतांनी विजयी ठरले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2024 3:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Datta Bharne : ''शांत झोप लागत नसेल तर...'', दत्ता भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला


