advertisement

खरातबरोबर पूजा विधीचे फोटो, नाशिकची 'कॅप्टन फाईल' ओपन होताच केसरकरांना झटका, आता म्हणतात....

Last Updated:

दीपक केसरकर मंत्री असताना सातत्याने नाशिकच्या भोंदूबाबाकडे जायचे. तसेच भोंदू बाबा खरात आणि केसरकर यांच्या अनेक भेटीही झाल्याचे फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत.

दीपक केसरकर-अशोक खरात
दीपक केसरकर-अशोक खरात
मुंबई : दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे यांची एसआयटीकडून चौकशी झाली आहे. दीपक लोंढे हा एसआयटीच्या फेऱ्यात अडकला आहे. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात दीपक लोंढे याची चौकशी करण्यात आली. दीपक लोंढे आणि अशोक खरात हे व्यावसायिक भागिदार असल्याचा संशय आहे. त्याच कारणातून दीपक लोंढे याला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करीत आहे. असे असताना केसरकर यांच्या प्रतिक्रियेकडे राज्याचे लक्ष लागले होते.
दीपक केसरकर मंत्री असताना सातत्याने नाशिकच्या भोंदूबाबाकडे जायचे. तसेच भोंदू बाबा खरात आणि केसरकर यांच्या अनेक भेटीही झाल्याचे फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत. केसरकर हे खरातकडून पूजाविधी करून घ्यायचे, असे आरोप होतायेत. मात्र हे सगळ्या आरोपांचे खंडन केसरकर यांनी केले.

खरातसोबत माझी मंदिराच्या कामामुळे ओळख

कॅप्टन खरात यांना ज्या गंभीर आरोपाखाली अटक झाली आहे, त्याच्याया कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईलच. कॅप्टन खरात यांच्याशी माझी ओळख केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणातून नाही, तर सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे झाली. या मंदिराच्या रस्त्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमची भेट झाली होती. खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र/ज्योतिषशास्त्र) मध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी केवळ त्या विषयापुरती ओळख आहे, असे सांगत कॅप्टन खरातसोबत वैयक्तिक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले.
advertisement
समाज माध्यमांवर फिरत असलेले फोटो हे ईशानेश्वर मंदिराच्या कामाच्या संदर्भातील किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहेत. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या निमंत्रणावरून लग्नाला जाणे किंवा शुभेच्छा देणे हा सामाजिक शिष्टाचार आहे, त्याचा वैयक्तिक प्रकरणांशी संबंध जोडू नये, असेही केसरकर म्हणाले.

संजय राऊतांच्या आरोपांवर दीपक केसरकर काय म्हणाले?

संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कॅप्टन खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेले नाहीत, त्यामुळे ते माझे विभाग चालवत होते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
advertisement

केवळ त्याच्यासोबत फोटो आहेत म्हणून....

माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते क्वचितच इतर कोणत्याही मंत्र्यांच्या काळात झाले असतील. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. केवळ फोटोंच्या आधारे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध जोडून चुकीची माहिती प्रसिद्ध करू नये, अशी विनंती केसरकर यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरातबरोबर पूजा विधीचे फोटो, नाशिकची 'कॅप्टन फाईल' ओपन होताच केसरकरांना झटका, आता म्हणतात....
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement