महाराष्ट्रात छावा सिनेमा 'टॅक्स फ्री' होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Last Updated:

Devendra Fadnavis On Chhaava Movie tax free : सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला छावा सिनेमा टॅक्स फ्री करावी, अशी मागणी होत असताना देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय.

Devendra Fadnavis On Chhaava Movie tax free
Devendra Fadnavis On Chhaava Movie tax free
Chhaava Movie Tax free : अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या संभाजी महाराजांवरील चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अनेक ठिकाणी सिनेमा हाऊसफुल असल्याचं पहायला मिळतंय. तर अनेकांना तासनतास रांगेत उभं राहून सिनेमाची तिकीटं मिळवावी लागत आहे. अशातच आता छावा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यापासून ते मराठा संघटनांनी देखील चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात छावा सिनेमा 'टॅक्स फ्री' होऊ शकत नाही, असं म्हणत कारण देखील सांगितलं.

महाराष्ट्रात करमणूक करच नाही - देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर नेहमी अन्याय केला. मात्र, त्यांच्यावर खूप चांगला सिनेमा आला आहे. या ऐतिहासिक सिनेमाला करमुक्त करण्याची मागणी होताना दिसतीये. परंतू एक लक्षात घ्या की, महाराष्ट्रात करमणूक करच नाहीये. परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला होता. त्यामुळे आपल्याकडे करमणूक करच नसल्याने करमुक्त करण्याचा विषयच येत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो, यावर आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलं आहे.
advertisement

टॅक्स फ्री करण्याची मागणी

राज्य सरकारने छावा चित्रपट करायला हवा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत हिंदी चित्रपट 'छावा' करमुक्त करण्याबाबत मराठा सेवा संघ, छावा संघटना तर्फे पारोळा तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन दिलं होतं.

छावा सिनेमाची कमाई किती?

दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 33.1 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या दिवशी 39.3 कोटी, तिसऱ्या दिवशी 49.03 कोटी आणि चौथ्या दिवशी 24.1 कोटी अशी या चित्रपटाची कमाई वाढतच गेली. पाचव्या दिवशी संध्याकाळपर्यंत या चित्रपटाने 8.57 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पाच दिवसांत ‘छावा’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन 154.1 कोटी रुपये झाले आहे. यासह चित्रपटाने 150 कोटींचा गल्ला पार केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात छावा सिनेमा 'टॅक्स फ्री' होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement