धनंजय मुंडे पुन्हा मंत्री झाले तर 100 वाल्मिक कराड, हजारो टोळ्या तयार होतील, धनंजय देशमुख संतापले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड 1 हजार टोळ्या आणि शेकडो खून पडतील, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली असून या भेटीनंतर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व प्रकारावर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड 1 हजार टोळ्या आणि शेकडो खून पडतील, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. आज औरंगाबाद खंडपीठासमोर वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. ही सुनावणी पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडे यांना अधिकृतरित्या मंत्रिपद दिले तर माझ्याकडे देखील पुरावे आहेत. कशा प्रकारे ही टोळी राजाश्रयाखाली होती. मागील काही दिवसात आमच्याकडे शासकीय, प्रशासकीय लोकांच्याऑडिओ क्लिप आल्या आहेत. यांची प्रशासनावर कशी जरब होती, कसे चुकीच्या गोष्टी करून घ्यायचे आणि ह सगळे कसे एकत्र आहेत याचे माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. हे पुरावे योग्य वेळी मी समोर आणेल.
advertisement
100 वाल्मिक कराड तयार होतील....
धनंजय मुंडेंच्या नावाखाली सगळा कारभार सुरू होता. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड, 1 हजार टोळ्या आणि शेकडो खून होतील यावर शासनाने विचार करावा... ही टोळी कशी राजश्रयात होती हे मी उघड करेल याबाबत दबाव येऊ शकतो असे पत्र मी न्यायालयात दिले आहे. आम्ही कुंटुंब म्हणून कठोर पाऊल नक्कीच उचलू कारण एक निष्पाप जीव गेला आहे. परत अशा गोष्टी कोणासोबत घडू नये यासाठी आमची लढाई सुरू आहे. आमचा माणूस गेला आहे तो पुन्हा येणार नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
आम्हाला न्याय मिळायला आज सुरुवात झाली : धनंजय देशमुख
वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, खऱ्या अर्थाने बोलतो हा न्याय काव्यात्मक आहे. माझ्या भावाला ज्याने संपवलं त्याला राष्ट्र संत भगवान बाबा जयंती दिवशी मकोका लावला. ज्याने मकोका लावण्याचा कायदा ज्याने केला त्या गोपीनाथ मुंडे जयंती दिवशी युक्तिवाद झाला, आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला, आम्हाला न्याय मिळायला आज सुरुवात झाली आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडे पुन्हा मंत्री झाले तर 100 वाल्मिक कराड, हजारो टोळ्या तयार होतील, धनंजय देशमुख संतापले










