Dhananjay Munde: जरांगेंच्या जवळच्या माणसाला धमकी, धनंजय मुंडेंचा थेट बीडच्या एसपींना फोन;वातावरण तापलं

Last Updated:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोन करून तुझा संतोष देशमुख करू, परळीच्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावर ये, अशी धमकी देण्यात आली आहे.

News18
News18
बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीस तात्काळ अटक करा, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. एवढच नाही तर त्याला पोलिसी खाक्या दाखवा, असं थेट एस पींना फोन करून धनंजय मुंडेंनी सांगितले आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे
गंगाधर काळकुटे यांना धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत काळकुटे यांना माझे नाव घेऊन धमकी देणाऱ्या अटक करा. तसेच बीड तालुक्यातील शेळके नामक कोणीतरी व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याला चांगलाच खाक्या दाखवावा, अशी सूचना केली आहे, ही माहिती धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे.
advertisement

ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी कट रचण्यात आल्याचं समोर आलं होत. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक देखील केली होती. हा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. मात्र, धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
advertisement

तुझा संतोष देशमुख करू, गंगाधर काळकुटे यांना फोन करून धमकी 

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोन करून तुझा संतोष देशमुख करू संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर आहे.. अशी धमकी देण्यात आली. थेट परळीच्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावर ये असे सांगण्यात आले. यानंतर गंगाधर काळकुटे यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली असून संबंधित व्यक्ती वरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांच्याकडून करण्यात आली. त्याचबरोबर माझे चुकीचे चॅट देखील व्हायरल करण्यात येत आहे यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे.. धमकीच्या क्लिपनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कारण मनोज जरांगेंनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला होता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde: जरांगेंच्या जवळच्या माणसाला धमकी, धनंजय मुंडेंचा थेट बीडच्या एसपींना फोन;वातावरण तापलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement