'सेल्फी काढायची म्हणाले अन् कारला लटकवून नेलं', हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण, VIDEO समोर

Last Updated:

Hotel Bhagyashri Owner Kidnapping: धाराशीव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं बुधवारी सायंकाळी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी स्वत: आपबिती सांगितली.

News18
News18
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२३) साययंकाळी घडला आहे. अज्ञात कारमधून आलेल्या पाच आरोपींनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण केलं आणि त्यांना बेदम मारहाण केली आहे. यादरम्यान मारहाण झाल्यामुळे हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या मालकीच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली. गाडीतील लोकांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी नागेश मडके हे कारजवळ गेले. कारमध्ये बसलेल्या आरोपींनी मडके यांनी कारच्या खिडकीजवळ बोलावलं. ते जवळ येताच आरोपींनी मडके यांना खिडकीत अडकवलं आणि त्यांचं अपहरण केलं. कारला लटकवून त्यांचं अपहरण केल्याचा दावा, हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने केला आहे.
advertisement

जीवे मारण्याचा कट

अपहरण केल्यानंतर गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारे, असा आरोप मडके यांनी केला आहे. हॉटेलकडून ही गाडी धाराशिवकडे नेण्यात आली. जवळपास पाच किलोमीटर अंतर फरपटत नेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी मडके यांना सोडून दिलं. अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्याचा डाव रचला होता, असा आरोपही नागेश मडके यांनी केला.
advertisement

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकावर रुग्णालयात उपचार सुरू

पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव (सि.) येथील पूलावर फेकून दिले. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे नागेश मडके यांनी सांगितले.
advertisement
मागील महिन्यात हॉटेल भाग्यश्रीवर हल्ला करून काही अज्ञातांनी तेथील पोस्टर फाडून टाकले होते. तसेच मागील आठवड्यात हॉटेलवर हाणामारी देखील झाली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठी गर्दी होत आहे. काही महिन्यापासून चर्चेत आलेल्या या हॉटेलमध्ये सध्या बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील हॉटेलच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यामुळे या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सेल्फी काढायची म्हणाले अन् कारला लटकवून नेलं', हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण, VIDEO समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement