पेंटर म्हणून काम केलं हाती काहीच उरत नव्हतं, मग सुरू केला डेकोरेशनचा व्यवसाय, आता लाखोंची उलाढाल

Last Updated:

स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असं अनेकांचं स्वप्न असतं. काही जण ते पूर्ण करतात पण काही भांडवल नसल्याने शांत राहतात. अशीच कहाणी धाराशिवमधील गणेश खामकर यांची आहे.

+
धाराशिव 

धाराशिव 

उदय साबळे, प्रतिनिधी 
धाराशिव : स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असं अनेकांचं स्वप्न असतं. काही जण ते पूर्ण करतात पण काही भांडवल नसल्याने शांत राहतात. अशीच कहाणी धाराशिवमधील गणेश खामकर यांची आहे. गणेश खामकर याचं स्वप्न व्यवसाय करण्याचे होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नव्हते. त्यामुळे त्यांनी काही दिवस पेंटर म्हणून काम केले. परंतु या व्यवसायात त्यांना म्हणावा तसा फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी खचून न जाता डेकोरेशनचा व्यवसायाला सुरुवात केली. त्याचा हा व्यवसाय आता यशस्वी झाला असून ते आज यामधून लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गणेश खामकर हे सुरुवातीला पेंटर म्हणून काम करीत होते. अप्रतिम पेंटिंग ते तयार करायचे परंतु पेंटिंगच्या व्यवसायातून त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नव्हतं. म्हणून त्यांनी डेकोरेशनचा व्यवसाय पंधरा वर्षांपूर्वी सुरू करण्याचा ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली. पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेला या व्यवसायाची आता मोठी भरभराट झालीय. आता त्यांना वर्षाकाठी 10 लाख रुपयांची उलाढाल होतेय, असं गणेश खामकर सांगतात.
advertisement
गणेश खामकर यांच्या दुकानात डेकोरेशनचे साहित्य मिळतं. त्याचबरोबर वाढदिवसाचे लग्न समारंभाचे डेकोरेशन ते करतात तर गौरी गणपतीच्या उत्सवा दरम्यान डेकोरेशनच्या व्यवसायात मोठी भरभराट होते. त्यावेळी स्वस्तात मखर सजावटीचे साहित्य, फ्लॉवर पॉट, गौरी गणेशोत्सवाच्या दरम्यानचे मंडप, आधी गोष्टींची ते स्वस्तात विक्री करतात.
advertisement
केवळ 5 हजार रुपयात सुरू केलेल्या व्यवसायाची उलाढाल मोठी झाली आहे. दीड लाख रुपयांपर्यंतचे डेकोरेशन ते करतात. त्यामुळे कष्ट आणि सातत्य या दोन्हीची जोड असली की व्यवसाय उत्कृष्टपणे करता येतो हे याचं अप्रतिम उदाहरण आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
पेंटर म्हणून काम केलं हाती काहीच उरत नव्हतं, मग सुरू केला डेकोरेशनचा व्यवसाय, आता लाखोंची उलाढाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement