Maratha Reservation : जरांगे पाटलांचा तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरु; ओबीसी बैठका अन् सभांबद्दल म्हणाले, मला..
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज पासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. हा दौरा केवळ गाठीभेटींचा दौरा आहे.
जालना, 15 नोव्हेंबर : मनोज जरांगे पाटील हे आज तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात करत आहेत. या दौऱ्यातील पहिली सभा धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात घेणार आहेत. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आपल्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली. आज धाराशिव जिल्ह्यातील वाशी व परंडा येथे जाहीर सभा घेणार असून या वाशी तील सभे ठिकाणी आयोजकांनी तयारी देखील पूर्ण केली आहे.
अंतरवाली सराटी गावातून ते दौऱ्याला सुरवात करत आहेत. छत्रपती शाहू महाराज यांचे आशीर्वाद घेऊन ते दौऱ्याला सुरवात करतील. पहिली सभा त्यांची धाराशिव तालुक्यातील वाशी येथे होणार आहे. जरांगे पाटील 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान 27 विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. दरम्यान ते अडीच हजार ते तीन किलोमीटरचा प्रवास करतील. 23 ला पुन्हा अंतरवाली सराटीला येऊन साखळी आंदोलन करतील आणि त्या नंतर चौथा टप्पा दौरा करणार आहेत. दौऱ्याचा उद्देश केवळ मराठा बांधवांशी संवाद असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज पासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. हा दौरा केवळ गाठीभेटींचा दौरा आहे. मराठा बांधवांच्या भेटी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी जातोय. गाठी भेटी आहेत पण लोक जास्त जमतात त्यामुळे मी काही करू शकत नाही. ओबीसी बैठका, सभा याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नये. त्यांच्या विरोधात आता बोलणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 15, 2023 9:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maratha Reservation : जरांगे पाटलांचा तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरु; ओबीसी बैठका अन् सभांबद्दल म्हणाले, मला..