Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीवरून 'वादाची कुस्ती', पुण्यातील स्पर्धा अवैध; राज्य कुस्तीगीर परिषदेचा आरोप

Last Updated:

राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन धाराशिवमध्ये करण्यात आले आहे.

हमालाच्या पोरानं पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा
हमालाच्या पोरानं पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा
बालाजी निरफळ, धाराशिव, 12 नोव्हेंबर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून सुरू असलेला वाद अद्याप संपलेला नाही. पुण्यात झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवैध असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केला आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन धाराशिवमध्ये करण्यात आले आहे. १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ही कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख  याने गतविजेत्या शिवराज राक्षेला अस्मान दाखवलं. सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा, कौतुकाच वर्षाव होत आहे. दरम्यान, आता कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. पुण्यात झालेली ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवैध असल्याचा आरोप राज्य कुस्तीगीर परिषदेने केला आहे.
advertisement
धाराशिवमध्ये येत्या 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी आज धाराशिवमध्ये कुस्तीगीर परिषदेच्या सभासदांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा आरोप करण्यात आला आहे धाराशिवमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये साडे नऊशे मल्ल सहभागी होतील अशी माहिती ही आयोजक यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीवरून 'वादाची कुस्ती', पुण्यातील स्पर्धा अवैध; राज्य कुस्तीगीर परिषदेचा आरोप
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement