'यांना धिंगाणा करायचा आहे पण..'; जरांगे पाटलांच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
धाराशिव, सिद्धार्थ गोदाम प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच मराठा आरक्षणाचा विषय सुटला की धनगर आणि मुस्लिम समाजासाठी काम करणार आहे, त्यांना आरक्षण कसं मिळत नाही ते बघतो असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
'मराठा आरक्षणाचा विषय सुटला की धनगर आणि मुस्लिम समाजासाठी काम करणार आहे, त्यांना आरक्षण कसं मिळत नाही ते बघतो. आमचे बारा बलुतेदार आहेत, त्यांच्याशिवाय आमचे आणि आमच्याशिवाय त्यांचे कोणी नाही. आम्ही एक आहोत हेच दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,' असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांची सत्ता अवघड आहे, म्हणून धाराशिवमध्ये मराठ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नुसत्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले. हे सगळ्यांच्या लक्षात आहे. यांना धिंगाणा करायचा आहे, पण संयम ठेवा, संयमामध्ये मोठी ताकत असते. कुणालाही अडवत बसू नका, यांना महत्त्व देऊ नका. त्यांना कुठेही हिंडू फिरू द्या काही फरक पडत नाही. समाजाला भविष्य दिसत आहे, म्हणून आक्रोश वाढला आहे. जे हक्काचे आहे ते मिळावे ही अपेक्षा, सरकार पळ काढत आहे. फक्त बैठका घेऊन वेळ काढत आहे, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
August 08, 2024 12:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
'यांना धिंगाणा करायचा आहे पण..'; जरांगे पाटलांच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस