Maratha Reservation : राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथे घुसून मराठा तरुणांचा राडा, तुफान घोषणाबाजी

Last Updated:

Maratha Reservation : मनसे प्रमुख राज ठाकरे थांबलेल्या धाराशिव येथील हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केली.

News18
News18
धाराशिव, (बालाजी निर्फळ, प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून (रविवार, 4 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या दौऱ्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून करणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली.
नेमकं काय घडलं?
मनसे प्रमुख राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल परिसरात मराठा कार्यकर्ते घुसले असून गोंधळ घालत घोषणाबाजी करत आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्येच ठिय्या मांडला आहे. सोलापूरमध्ये आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
advertisement
आरक्षणावर राज ठाकरे काय बोलले होते?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज सकाळी ते सोलापुरात होते. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
advertisement
कसा असणार राज ठाकरे यांचा दौरा?
राज ठाकरे पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर फोकस करणार आहेत. पुण्यात पूरग्रस्त नागरिकांशी राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चा करणार असून त्यानंतर ते सोलापूरकडं रवाना होतील. राज ठाकरे यांनी मागच्या आठवड्यातही पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला होता.
view comments
मराठी बातम्या/धाराशिव/
Maratha Reservation : राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथे घुसून मराठा तरुणांचा राडा, तुफान घोषणाबाजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement