सरकारी नोकरी लागलेल्या तरुणाईच्या हस्ते वृक्षारोपण, धाराशिवमधील हा अनोखा उपक्रम काय?, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील ईट येथील वृक्ष संवर्धन टीमच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : शासकीय नोकरीत भरती झालेल्यांचे अभिनंदन करायचे आणि त्यांचा सत्कार करायचा, तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करायचे, असा कौतुकास्पद उपक्रम धाराशिव जिल्ह्यात राबवण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील ईट येथील वृक्ष संवर्धन टीमच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
काय आहे नेमका हा उपक्रम -
धाराशिव जिल्ह्यातील ईट येथील वृक्ष संवर्धन टीमच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये ईट आणि परिसरात शासकीय सेवेत नव्याने भरती झालेल्या नवनिर्माण क्षेत्रांना निमंत्रण देऊन ज्या ठिकाणी वृक्षरोपण केले जाते. त्याच ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला जातो. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून नव्याने शासकीय सेवेत भरती होणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाते.
advertisement
सोलापूरच्या 13 वर्षांच्या सृष्टीचा लाठी ‘पराक्रम’, इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद
याच पार्श्वभूमीवर ईट वृक्ष संवर्धन टीमकडून निपाणी येथील अजित खोसे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पखरुड येथील सूरज चव्हाण यांची जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल सत्कार करून त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सचिन शिंदे व महादेव साबळे यांचे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. या पाच जणांच्या हस्ते पिंपळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
advertisement
भाडेकरार 11 महिन्यांचाच का केला जातो?, अनेकांनाही माहिती नसेल, हे आहे यामागचं महत्त्वाचं कारण
यावेळी शासकीय सेवेतील नवनियुक्त उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. तर प्रगतशील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. ज्या व्यक्तीची शासकीय सेवेत निवड झाली त्या व्यक्तीसाठी झालेला सत्कार हा अविस्मरणीय असतो. त्या व्यक्तीच्या हस्ते लावण्यात आलेले झाड हेही त्या व्यक्तीसाठी अविस्मरणीय असते. त्यामुळे वृक्ष संवर्धन टीमच्या वतीने राबवण्यात येणारा हा अभिनव उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, अशी भावना याठिकाणी व्यक्त केली जात आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 13, 2024 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
सरकारी नोकरी लागलेल्या तरुणाईच्या हस्ते वृक्षारोपण, धाराशिवमधील हा अनोखा उपक्रम काय?, VIDEO