मी खूप भोगलंय, माझ्यावर साडेतीनशे गुन्हे पण.. अपंग कल्याण कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू भावूक
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
धाराशिवमध्ये अपंगाच्या अडचणी सोडवण्यासाठी अपंग कल्याण विभागामार्फत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू चांगलेच भावूक झाले.
धाराशिव, 22 सप्टेंबर, बालाजी निरफळ : माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत, कोर्टानं काही प्रकरणात शिक्षाही सुनावली आहे. हा सगळा अपंगाचा कारभार उगाच उभा राहिला नाही, हे सगळं उभं करण्यासाठी मी खूप काही भोगलं आहे. काही लोकांना वाटतं इथं बटन दाबलं की इथं काम व्हायला पाहिजे, ते तसं होत नाही, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत, कोर्टाने काही प्रकरणात शिक्षाही सुनावली आहे, हा सगळं अपंगाचा कारभार उगाच उभा नाही राहिला. हे सगळ करण्यासाठी मी खूप काही भोगलं आहे, यातूनच हे उभं राहिला आहे. लोकांना वाटतं इथं बटन दाबलं की इथं काम व्हायला पाहिजे ते तसं होत नाही, त्याला झगडावं लागतं.
advertisement
पूर्ण आयुष्य जेलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे, तरी पण राजकारणात मी काही कमावण्यासाठी नाही तर प्रामाणिक काम करण्यासाठी आलो आहे. धाराशिवमध्ये अपंगाच्या अडचणी सोडवण्यासाठी अपंग कल्याण विभागामार्फत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू चांगलेच भावूक झाले.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
September 22, 2023 1:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
मी खूप भोगलंय, माझ्यावर साडेतीनशे गुन्हे पण.. अपंग कल्याण कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू भावूक