'मविआ'मध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, लवकरच अचारसंहितेची घोषणा होऊ शकते, महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी देखील सुरु केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव आघाडीवर आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, आम्हाला सामान्य कष्टकरी व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारं सशक्त असं सरकार द्यायचं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं आहे.
advertisement
दरम्यान राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं, यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या वेदना खूप मोठ्या आहेत, चर्चेतून मार्ग काढणं गरजेचं आहे. राज्यात सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत आमचं सरकार नाही, त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नावर मी कुठलंच आश्वासन देत नाही किंवा मी आश्वासन देणारी नेता नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
August 14, 2024 12:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
'मविआ'मध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं