Eknath Shinde : दरे गावातून एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदावर काय म्हणाले?

Last Updated:

साधारण दोन दिवस ते कोणत्याच भेटी गाठी घेत नव्हते. त्यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज आपल्या दरे गावातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पेचावर प्रतिक्रिया दिली आहे.

eknath shinde
eknath shinde
Eknath Shinde News : महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून पेच निर्माण झाल्यानंतर अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर मुंबई आल्यानंतर थेट आपल्या साताऱ्यातील गाव गाठलं होतं. या दरम्यान साधारण दोन दिवस ते कोणत्याच भेटी गाठी घेत नव्हते. त्यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज आपल्या दरे गावातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पेचावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार स्थापन होईल, तीनही नेत्यांमध्ये समन्वय असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीसह अनेक मुद्यावर भाष्य केले आहे. मी मुख्यमंत्री पदावर याआधीच माझं म्हणण स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी. नड्डा हे ज्या व्यक्तीने नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवणार आहेत,त्या नावाला माझा पाठिंबा असणार आहे. त्यामुळे काही किंतू परंतूचा प्रश्न येत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, महायुतीच सरकार स्थापन होणार आहे.यामध्ये कुठलीच आडकाठी येणार नाही. आमच्या तीन पक्षांमध्ये समन्वय आहे. आणि आम्हाला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. तसेच महाराष्ट्राच्या जननेते आम्हाला इतका मोठा आशीर्वाद दिलाय की विरोधकांना विरोधीपक्ष नेतेपदही उरलं नाही आहे. त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरुन दिलं आहे, आता आम्हाला त्यांचा विकास करायचा आहे. यावर आता आम्ही काम करणार आहोत, असे शिंदे म्हणाले आहेत.
advertisement
तसेच महायुतीची शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे,स्थळही ठरलंय पण मुख्यमंत्री जाहीर झाला नाही. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, भाजपची उद्या विधी मंडळ पक्षाची मिटींग आहे. ही बैठक झाल्यावर सगळ स्पष्ट होईल.त्यामुळे चिंता करू नका, असे शिदेंनी यावेळी सांगितले आहे. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हिएम खराब आहे आणि जेव्हा जिंकता तेव्हा चांगलं आहे,असा टोला एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : दरे गावातून एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदावर काय म्हणाले?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement