Ajit Pawar Biopic : अजित पवारांवर बायोपिक? कोण साकारणार प्रमुख भूमिका, दादांनीच सांगितलं होतं या अभिनेत्याचं नाव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ajit Pawar Biopic : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्यावर कधी बायोपिक आला तर त्यांची भूमिका कोण साकारेल? दादांनी स्वत: त्या अभिनेत्याचं नाव सांगितलं होतं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र दु:खात बुडाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भाषणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत. दादांचा स्पष्टवक्तेपणा, त्यांची विनोदबुद्धी, त्यांचे राजकीय विचार हे सगळंच उल्लेखनीय होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दादांचं बोलणं ऐकून डॉ. निलेश साबळे म्हणाला, "खरंतर मी किती चांगलं करतो हे मला माहिती नाही. पण लोकांना आवडायचं. पण मला हे माहिती नव्हतं की, सर बघतात, दादा स्वत: बघतात. पण आता मला कळलंय की ते बघतात त्यामुळे आता जरा जास्त जपून करायला पाहिजे. मी त्यांची जेवढी भाषणं बघितली आहेत तेव्हा मला हे कळलं की, त्यांचा बोलण्याचा एक टोन आहे, त्यांच्या आवाजात एक बेस आहे."
advertisement
advertisement








