advertisement

Uddhav Thackeray Eknath Shinde: हालचालींना वेग, ठाकरे गटासोबत युती करणार? शिंदे गटाच्या शिलेदारानं स्पष्ट सांगितलं, ''आमच्याकडून आता..''

Last Updated:

Uddhav Thackeray Eknath Shinde Alliance : भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा कोकणात सुरू झाली होती. या चर्चांवर अखेर शिवसेना शिंदे गटाच्या शिलेदाराने भाष्य केले आहे.

कोकणात हालचाली, ठाकरे गटासोबत युती करणार? शिंदे गटाच्या शिलेदारानं स्पष्ट सांगितलं,  ''आमच्याकडून आता..''
कोकणात हालचाली, ठाकरे गटासोबत युती करणार? शिंदे गटाच्या शिलेदारानं स्पष्ट सांगितलं, ''आमच्याकडून आता..''
भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग: स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत असून राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू होती. भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा कोकणात सुरू झाली होती. या चर्चांवर अखेर शिवसेना शिंदे गटाच्या शिलेदाराने भाष्य केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप आमदार नितेश राणे यांना रोखण्यासाठी शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड कोकणात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणणारी घडामोड कणकवलीत उभी राहिली आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
advertisement
शिंदे गटाचे नेते, माजी आमदार राजन तेली यांनी यावर भाष्य केले आहे. राजन तेली यांनी सांगितले की, अशी कोणतीही गुप्त बैठक झाली नाही. मात्र, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीत एकत्रितपणे शांततेत निवडणूक घेण्याबाबत चर्चा झाली. निवडणूक आघाडी आणि इतर मुद्यांबाबतचा आम्ही प्रस्ताव पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. त्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली, तर पुढील प्रक्रिया होईल असे सूचक वक्तव्य केले.
advertisement

राणेंविरोधात विरोधक एकवटले...

शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटासह महाविकास आघाडी यांनी एकत्रित येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्याची हालचाल सुरू केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून कणकवलीत भाजपविरोधात आणि राणेंविरोधात आघाडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. कणकवली नगर पंचायत अध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नलावडे इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी आणि शिंदेसेना हातमिळवणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Eknath Shinde: हालचालींना वेग, ठाकरे गटासोबत युती करणार? शिंदे गटाच्या शिलेदारानं स्पष्ट सांगितलं, ''आमच्याकडून आता..''
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement