अखेर मुंबई महापालिकेसाठी ठाकरे एकत्र; परंतु घोषणेवेळी बाळा नांदगावकर अनुपस्थित, समोर आलं कारण

Last Updated:

युतीच्या घोषणेवेळी राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू बाळा नांदगावकर कुठे होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

News18
News18
मुंबई :   मराठीच्या मुद्द्यावरुन झालेल्या ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाचा नवा अंक आज पाहायला मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी युती जाहीर केली आहे. युती जाहीर झाल्यानंतर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ज्या वेळी युती जाहीर झाली त्यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. मात्र मनसे नेते बाळा नांदगावकवर अनुपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे पत्रकार परिषदेच्या शेवटी दोन्ही बंधूंनी संजय राऊतांना दोघांमध्ये घेऊन फोटोही काढले. त्यामुळे या युतीच्या घोषणेवेळी राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू बाळा नांदगावकर कुठे होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शिवसेनेत असतानाही बाळा नांदगावकर यांची ओळख राज ठाकरे यांची कट्टर समर्थक अशी होती. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी वैर घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यावेळी त्यांच्यासोबतच बाळा नांदगावकर यांनीही शिवसेना सोडली. थेट बाळासाहेब ठाकरे यांना भेटून शिवसेना शाखेच्या किल्ल्या देऊ केल्या. परंतु काही वर्षांनी दोन भावांनी एकत्र आले पाहिजे, असा सूम उमटायला लागल्यानंतर त्यांच्या एकत्रिकरणासाठी नांदगावकर यांनी मनोमन प्रयत्न केले. अखेर हिंदीसक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी दोन ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांसाठी एकत्र आल्याने नांदगावकर यांचे स्वप्न साकार झाले. मात्र नांदगावकर यांची अनुपस्थिती सर्वांना खटकत होती. परंतु त्यांचे तब्येत ठीक नसल्याने आज ते पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हते.
advertisement

बाळा नांदगावकरांची तब्येत बिघडली? 

मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी  बाळा नांदगावकर सुरूवातीपासून प्रयत्न करत होते. युतीच्या चर्चेच्या प्रत्येक बैठकीसाठी बाळा नांदगावकर उपस्थित होते. मात्र परवा रात्रीच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांना घशामध्ये इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे काल देखील बैठकीला नव्हते आणि आज देखील पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.
advertisement

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. आज शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही, असंही राज ठाकरेंनी सांगितले. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा विश्वासही राज ठाकरेंनी व्यक्त केला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अखेर मुंबई महापालिकेसाठी ठाकरे एकत्र; परंतु घोषणेवेळी बाळा नांदगावकर अनुपस्थित, समोर आलं कारण
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement