मोड आलेली मटकी-मूग खातो, मग बटाटे का नाही? 99 टक्के गृहिणींना माहित नाहीत ही कारणं

Last Updated:
जर मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी 'वरदान' ठरतात, तर मग मोड आलेले बटाटे खाऊ नका, असं आरोग्यतज्ज्ञ का बजावतात?
1/9
मुग-मटकी सारखे कडधान्य आरोग्यासाठी चांगले असतात, त्यामुळे हल्ली बहुतांश लोक त्याचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करतात. शक्यतो लोक मोड आलेले मुग किंवा मटकी खातात जे आणखी चांगलं असतं आरोग्यासाठी. काही लोक याला नाष्टा म्हणून खातात तर काही लोक याची भाजी बनवून खातात. मोड आलेली कडधान्ये शरीरासाठी इतकी उत्तम असतात की, जिम जाणारे तरुण असोत किंवा घरचे ज्येष्ठ नागरिक, डॉक्टरही आवर्जून ते खाण्याचा सल्ला देतात. मोड येण्यामुळे त्यातील पोषक तत्वे कित्येक पटीने वाढतात.

advertisement
2/9
पण, इथेच एक मोठा पेच निर्माण होतो. जर मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी 'वरदान' ठरतात, तर मग मोड आलेले बटाटे खाऊ नका, असं आरोग्यतज्ज्ञ का बजावतात? एकाला मोड आले तर तो 'सुपरफूड' बनतो आणि दुसऱ्याला मोड आले तर तो 'विषारी' का ठरतो? यामागे नेमकं काय विज्ञान आहे, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

3/9
मूग-मटकी आणि बटाट्यातला सर्वात मोठा फरकमुळात मूग आणि मटकी या 'बिया' आहेत. जेव्हा त्यांना मोड येतात, तेव्हा त्यातील साठवलेली ऊर्जा सक्रिय होते आणि त्यातून नवीन जीवन निर्माण होतं. यामुळेच त्यात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन्स वाढतात.

4/9
मात्र, बटाटा हे बी नसून ते जमिनीखालील एक कंद आहे. बटाट्याला जेव्हा मोड येतात, तेव्हा तो स्वतःमधील स्टार्चचं रूपांतर साखरेत करतो आणि या प्रक्रियेत काही नैसर्गिक पण घातक रसायने तयार होऊ लागतात.

5/9
बटाट्याचे कोंब का धोकादायक असतात?आरोग्यतज्ज्ञांच्या मते, बटाट्याला कोंब फुटले की त्यात 'सोलेनाईन' (Solanine) आणि 'चॅकोनाईन' नावाचे विषारी घटक तयार होतात.
ज्या बटाट्याला कोंब फुटतात, तो बटाटा अनेकदा एका बाजूने 'हिरवा' पडू लागतो. हा हिरवा रंग म्हणजे सोलेनाईन नावाचं विष साचल्याची खूण आहे.
बटाट्याचे कोंब का धोकादायक असतात?आरोग्यतज्ज्ञांच्या मते, बटाट्याला कोंब फुटले की त्यात 'सोलेनाईन' (Solanine) आणि 'चॅकोनाईन' नावाचे विषारी घटक तयार होतात.ज्या बटाट्याला कोंब फुटतात, तो बटाटा अनेकदा एका बाजूने 'हिरवा' पडू लागतो. हा हिरवा रंग म्हणजे सोलेनाईन नावाचं विष साचल्याची खूण आहे.
advertisement
6/9
जर तुम्ही असे मोड आलेले किंवा हिरवे झालेले बटाटे खाल्ले, तर पोटात दुखणे, उलट्या, जुलाब किंवा अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा धोका असतो. काही वेळा यामुळे मज्जासंस्थेवरही ताण येऊ शकतो.

7/9
मग सर्वच मोड आलेले बटाटे फेकून द्यायचे का?बऱ्याचदा गृहिणी सगळा बटाटा का टाकून द्यायचा? पैसे का वाया घालवायचे म्हणून मोड आलेला किंवा काळा-हिरवा पडलेला भाग काढून फेकून देतात. पण अस करणं योग्य नाही, मग अशा वेळी काय करावं?
1. मोड छोटे असतील तर: जर बटाटा अजूनही कडक असेल आणि मोड अगदी सुरुवातीच्या स्थितीत असतील, तर तो भाग सुरीने खोलवर कापून काढा. उरलेला बटाटा तुम्ही वापरू शकता.
2. जर बटाटा मऊ झाला असेल: जर बटाटा दाबायला मऊ लागत असेल आणि त्याला मोठे कोंब आले असतील, तर मात्र तो फेकून देणंच शहाणपणाचं आहे. कारण अशा वेळी विषारी घटक संपूर्ण बटाट्यात पसरलेले असतात. 
3. हिरवा भाग कधीच खाऊ नका बटाट्यावर कितीही छोटा हिरवा डाग दिसला तरी तो भाग मुळीच वापरू नका.
मग सर्वच मोड आलेले बटाटे फेकून द्यायचे का?बऱ्याचदा गृहिणी सगळा बटाटा का टाकून द्यायचा? पैसे का वाया घालवायचे म्हणून मोड आलेला किंवा काळा-हिरवा पडलेला भाग काढून फेकून देतात. पण अस करणं योग्य नाही, मग अशा वेळी काय करावं?1. मोड छोटे असतील तर: जर बटाटा अजूनही कडक असेल आणि मोड अगदी सुरुवातीच्या स्थितीत असतील, तर तो भाग सुरीने खोलवर कापून काढा. उरलेला बटाटा तुम्ही वापरू शकता.2. जर बटाटा मऊ झाला असेल: जर बटाटा दाबायला मऊ लागत असेल आणि त्याला मोठे कोंब आले असतील, तर मात्र तो फेकून देणंच शहाणपणाचं आहे. कारण अशा वेळी विषारी घटक संपूर्ण बटाट्यात पसरलेले असतात.3. हिरवा भाग कधीच खाऊ नका बटाट्यावर कितीही छोटा हिरवा डाग दिसला तरी तो भाग मुळीच वापरू नका.
advertisement
8/9
बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून काय करावं?आपण अनेकदा कांदे आणि बटाटे एकाच टोपलीत ठेवण्याची चूक करतो. कांद्यातून बाहेर पडणाऱ्या काही गॅसेसमुळे बटाट्याला खूप लवकर मोड येतात. त्यामुळे बटाटे नेहमी कांद्यापासून लांब, अंधाऱ्या आणि थंड जागी ठेवावेत.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement