Saba Azad Hospitalised: एकीकडे हृतिकचा डान्स, दुसरीकडे गर्लफ्रेंड हॉस्पिटलमध्ये! भावाच्या लग्नात नेमकं काय झालं?

Last Updated:
Saba Azad Hospitalised: दरम्यान, हा आनंदाचा सोहळा सुरू असतानाच हृतिकची लेडी लव्ह सबा आझादबाबत एक चिंतेची बातमी समोर आली आहे. भर लग्नातून गायब झालेली सबा चक्क हॉस्पिटलच्या बेडवर दिसल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
1/11
मुंबई: सध्या सगळीकडेच लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळतंय. मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये लग्नगाठ बांधली आहे. अशातच आता बॉलिवूडमधील मोठ्या घराण्यात लग्नाची लगबग पाहायला मिळाली.

advertisement
2/11
हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशन नुकतंच लग्नबंधनात अडकला आहे. या सोहळ्याला बॉलिवूडच्या बड्या सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी हृतिकचा त्याच्या मुलांसोबतचा डान्सचा व्हिडीओ पाहून सगळेच शॉक झाले आहेत.

3/11
दरम्यान, हा आनंदाचा सोहळा सुरू असतानाच हृतिकची लेडी लव्ह सबा आझादबाबत एक चिंतेची बातमी समोर आली आहे. भर लग्नातून गायब झालेली सबा चक्क हॉस्पिटलच्या बेडवर दिसल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

4/11
ईशान रोशन आणि ऐश्वर्या सिंह यांच्या लग्नात हृतिक रोशनने आपल्या दोन्ही मुलांसह धमाकेदार डान्स केला. 'ऑल ब्लॅक' लूक मध्ये हृतिक नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसत होता. जेव्हा सुखबीरचं गाणं 'इश्क तेरा तडपावे' वाजलं, तेव्हा हृतिकला मोह आवरला नाही.

5/11
त्याने आपल्या मुलांसोबत स्टेजवर जाऊन असा काही डान्स केला की लग्नात आलेले पाहुणेही थक्क झाले. हृतिकच्या चेहऱ्यावर भावाच्या लग्नाचा आनंद ओसंडून वाहत होता.

6/11
लग्नाच्या सुरुवातीला सबा आझाद हृतिक आणि त्याच्या मुलांसोबत पॅप्सना पोझ देताना दिसली होती. पण त्यानंतर ती या ग्रँड सोहळ्यातून गायब झाली. चाहत्यांना वाटलं की ती कदाचित गडबडीत असेल, पण सत्य काही वेगळंच होतं.

7/11
सबाने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ग्लुकोज चढवलेल्या अवस्थेत बेडवर झोपलेली दिसत आहे.

8/11
फोटो शेअर करताना सबाने लिहिलंय,
फोटो शेअर करताना सबाने लिहिलंय, "बाहेरचं खाणं खाऊ नका, प्लीज असं करू नका! या एका नॉटी बगमुळे माझ्या भावाचं लग्न हुकता हुकता वाचलं." सबाला फूड पॉइजनिंग किंवा पोटाचं गंभीर इन्फेक्शन झाल्याचं समजतंय, ज्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं.
advertisement
9/11
लग्नाचं सीझन सुरू असताना बाहेरचं खाणं कसं महागात पडू शकतं, याचा अनुभव सबाने स्वतः घेतला आहे. तिने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे की, स्वच्छतेची काळजी घ्या आणि बाहेरचं उघडं अन्न टाळा. सबाच्या या पोस्टनंतर तिचे चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

10/11
हृतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. हृतिक आता ५२ व्या वर्षात पदार्पण करणार आहे, तर सबा ४० वर्षांची आहे.

11/11
वयातील १२ वर्षांच्या अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं, पण या जोडीने आपल्या केमिस्ट्रीने नेहमीच ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सुझैन खानपासून वेगळं झाल्यानंतर हृतिकच्या आयुष्यात सबा आझाद आली आणि गेल्या काही वर्षांपासून ते एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.

CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement