advertisement

Yavatmal: दारूची नशा डोक्यात गेली, समोर मित्रही दिसता नाही, मल्लेशला जागेवरच संपवलं; यवतमाळ हादरलं

Last Updated:

स्थाानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरूनच आरोपी भुऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

News18
News18
भास्कर मेहेरे, प्रतिनिधी
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आाहे.  वणी शहरात बाकडे पेट्रोलपंपाजवळ दोन मित्रांमधील किरकोळ वाद थेट खूनापर्यंत पोहोचला. मित्रानेच आपल्या मित्राचा प्राणघातक शस्त्राने हल्ला करून जीव घेतला. पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे. पण, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी शहरातील बाकडे पेट्रोलपंपाजवळ बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  मल्लेश नेरकुंटलावार (वय २४) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर भुऱ्या असं आरोपीचं नाव आहे. दोन्ही तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते.
advertisement
बाकडे पेट्रोलपंपाजवळ असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानासमोर ही घडली. या दुकानाच्या व्हरांड्यामध्ये मयत तरुण मल्लेश झोपलेला होता. त्यावेळी आरोपी भुऱ्यासोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाली. दोघेही दारू प्यायलेले होते. दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला. आरोपी भुऱ्याने लोखंडी सळईने मल्लेशच्या डोक्यावर सपासप वार केले. वार वर्मी बसल्यामुळे मल्लेशचा जागेवरच मृत्यू झाला.
पेट्रोलपंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मल्लेश पाहून नागरिकांना धक्का बसला. स्थाानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  मल्लेशचा मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरूनच आरोपी भुऱ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
उसनवारी पैशातून वाद
"आरोपीने मृतकाकडून उसनवारीने पैसे घेतले होते, या पैशावरून दोघांमध्ये दुपारी वाद झाला आणि त्यानंतर रात्री आरोपीने हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. खूनामागील नेमकं कारण शोधण्यासाठी आरोपीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वणी पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Yavatmal: दारूची नशा डोक्यात गेली, समोर मित्रही दिसता नाही, मल्लेशला जागेवरच संपवलं; यवतमाळ हादरलं
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement