'तू मला काय देणार', गडचिरोलीच्या डॉक्टरची नर्सकडे शरीरसुखाची मागणी, घाणेरड्या चॅटिंगला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पीडित परिचारिकेवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
महेश तिवारी, प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिह्यात मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात कार्यरत असलेल्या एका 45 वर्षीय कंत्राटी परिचारिकेने सतत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत असलेल्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्या पीडित परिचारिकेवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
पीडित महिला तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत आहे. त्यांची दोन वर्षापासून वेतनवाढ थांबवण्यात आली होती. त्यामुळे त्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना व्हाट्सअप मॅसेजवरून संपर्क करायच्या. मात्र तालुका आरोग्य अधिकाऱ्याने चॅटिंगद्वारे शरीर सुखाची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिचारिका कर्तव्य पार पाडल्यानंतर घरी परतली. ती प्रचंड तणावात होती. रात्री जेवण करून पतीला झोप लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले. त्यामुळे तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचारांनंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
advertisement
आरोग्य विभागात प्रचंड खळबळ
या प्रकरणातील अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स समोर आल्यानंतर आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. परिचारिकेच्या पतीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर पैसे नको, मला तूच पाहिजेस, असा कथित घृणास्पद दबाव टाकल्याचा थेट आरोप केला असून संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पीडितेच्या पतीने केली आहे. पीडित परिचारिकेचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर याआधीही गंभीर आरोप करण्यात आले आहे. . मात्र वरिष्ठांच्या पाठबळामुळे कोणतीही कारवाई न झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होती.
advertisement
काय कारवाई होणार?
आरोग्य अधिकारी यांची भेट या घटनेनंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरूणीची भेट घेतली. परिचारिका उपचारात असल्याने संवाद होऊ शकला नाही, मात्र तिच्या पतीकडून संपूर्ण माहिती घेतली. उपलब्ध चॅट आणि इतर पुराव्यांवर आधारित सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्याची माहिती सीईओंनी दिली आहे. या प्रकरणात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दक्ष भूमिका घेतली असून पोलीस तक्रारीची प्रत प्राप्त होताच संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचा प्रस्ताव पाठवला जाईल, असे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी म्हटले आहे. आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
December 08, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तू मला काय देणार', गडचिरोलीच्या डॉक्टरची नर्सकडे शरीरसुखाची मागणी, घाणेरड्या चॅटिंगला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल


