ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय ..उच्च जातीचं नाव काय? आठवीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेत प्रश्न; पुरोगामी महाराष्ट्र हादरला
- Published by:Prachi Amale
- Reported by:Bhaskar Mehare
Last Updated:
ऑनलाइन सराव चाचणीच्या एक प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आलेला प्रश्न चांगलाच वादाचे कारण बनण्याचा शक्यता आहे.
यवतमाळ: इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पीक अप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबिविली होती. यात जवळपास 24 विद्यार्थी सराव करीत होते. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडू शकतील अशी ही व्यवस्था होती. या टार्गेट पीक अप्सच्या 8 विच्या दुसऱ्या ऑनलाइन सराव चाचणीच्या एक प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आलेला प्रश्न चांगलाच वादाचे कारण बनण्याचा शक्यता आहे.
या प्रश्न ऑनलाइन प्रश्न पत्रिकेत इयत्ता 8च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत उच्च जातीचे नाव काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यामुळे शिक्षकांमधून संताप उमटला असून, विद्यार्थ्यांच्या मनातून जातीय निर्मूलन कसे करणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे. या प्रश्नासंदर्भात संबंधित संस्थेकडून प्रश्नाची ठेवण आणि भाषा चुकीची होती त्यामुळे त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे त्यांनतर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले.
advertisement
संस्थेवर कारवाई होणार
या संदर्भात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या मंदार पत्की म्हणाले, इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप परीक्षेत मदत व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून टार्गेट पीक हा उपक्रम सुरू केला होता. त्यामध्ये पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची पेपर तपासणी आणि पेपर तयार करण्याची जबाबदारी टार्गेट पीक या संस्थेला दिली होती.सध्या पाचवी आणि आठवीचे जवळपास २४ हजार विद्यार्थी तयारी करत असून फेब्रुवारीत ते परीक्षा देणार आहेत. यामध्ये सराव परीक्षेत उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नानाचा संदर्भ सदर संस्थेचा विचारला असता एनसीआरच्या इयत्ता आठवीच्या सातव्या धड्यात महिला जाती आणि सुधारणा यावर आधारीत तो प्रश्न विचारला होता. परंतु त्या प्रश्नाची ठेवण ही स्पष्ट चुकीची असून लेखी उत्तर मागवले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement

दोन महिन्यात त्यांच्याकडून अधिकाधिक सराव करून घेण्यात येणार
मुलांच्या परीक्षेत कोणताही व्यत्यय येणार नाही, तसेच परीक्षेत विद्यार्थी चांगले गुण कसे मिळवतील यावर जिल्हा परिषदेचा भर असणार आहे. दोन महिन्यात त्यांच्याकडून अधिकाधिक सराव करून घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
view commentsLocation :
Yavatmal,Maharashtra
First Published :
December 08, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय ..उच्च जातीचं नाव काय? आठवीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेत प्रश्न; पुरोगामी महाराष्ट्र हादरला


