पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी! 23 जानेवारीला 'या' भागातील सर्व शाळांना सुट्टी, रस्ते दिवसभर राहणार बंद
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरता स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
पुणे : पिंपरी- चिंचवड आणि पुणेकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील नामांकित 171 सायकलिस्ट 40 देशातून सहभागी झाले आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने चौथ्या टप्प्याच्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दुपारी 12 नंतर शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
टप्पा क्रमांक चार अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून ती पुणे शहरहद्दीत जावून परत राजीव गांधी ब्रिजमार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार करुन ती सागवी, वाकड, निगडी, त्रिवणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे. ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडणेकरीता तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळणेकरिता स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून वाहतूक पर्यायी मार्गान वळविण्यात आलेली आहे.
advertisement
शाळा दुपारी 12 वाजल्यानंतर बंद
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरीता स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एम.आय.डी.सी, चिखली, काळेवाडी, भोसरी एम.आय.डी.सी., यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील सर्व शासकीय व खाजगी शाळा दुपारी 12 वाजेनंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर
advertisement
स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला असून त्याचे एकूण 58 कि.मी अंतर आहे. त्यामुळे पुणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आदेश जारी करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 3:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी! 23 जानेवारीला 'या' भागातील सर्व शाळांना सुट्टी, रस्ते दिवसभर राहणार बंद









