लवकरचं सुखाचे दिवस येणार! गुरुचं मार्गी होणं 'या' 3 राशींच्या लोकांना बनवणार श्रीमंत; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये 'देवगुरु' बृहस्पतीला सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचा कारक मानले जाते. जेव्हा गुरु शुभ स्थितीत किंवा मार्गी चालीने चालतो, तेव्हा जातकाच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात.
advertisement
advertisement
मेष - रखडलेली कामे होणार पूर्ण: मेष राशीच्या लोकांसाठी गुरु मार्गी होणे अत्यंत शुभ फलदायी ठरेल. तुमच्या नशिबाची साथ आता तुम्हाला मिळणार आहे. जे प्रकल्प पैशांअभावी रखडले होते, ते आता गतीने पूर्ण होतील. नोकरीत बढती आणि पगारवाढीचे संकेत आहेत. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ असेल.
advertisement
सिंह - उत्पन्नाच्या स्रोतात मोठी वाढ: सिंह राशीच्या जातकांसाठी गुरुची मार्गी चाल लाभाच्या स्थानी प्रभाव पाडेल. तुमच्या उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मान-सन्मान मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला नवीन मोठे सौदे मिळतील.
advertisement
वृषभ - बँक बॅलन्स वाढणार: वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु धन स्थानी मार्गी होत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल आणि तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमची संवादशैली प्रभावी होईल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची छाप पडेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होईल.







