मनसे-एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र, बाळा नांदगावकर यांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. शिंदे-मनसेने एकत्र येऊन शिवशक्ती आघाडीची स्थापना केली आहे.

राज ठाकरे-एकनाथ शिंदे-बाळा नांदगावकर
राज ठाकरे-एकनाथ शिंदे-बाळा नांदगावकर
मुंबई : एकत्र आलोय ते एकत्रित राहण्यासाठी असा प्रचार महापालिका निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आला. मात्र निवडणुकीचा निकाल लागताच दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्याचे दिसते. कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. शिंदे-मनसेने एकत्र येऊन शिवशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. दुसरीकडे शिंदेसेनेवर दबाव टाकून वाटाघाटीत बाजी मारण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे होते. मात्र मनसेने शिंदेसेनेचे हात बळकट केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हिरमोड झाला आहे. स्थानिक राजकारण वेगवेगळी वळणे घेत असताना मनसेची याला मूकसंमती असल्याचे दिसते.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्थानिक पातळीवर असे निर्णय घेतले जातात, असे सांगून एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या युतीला पक्षाची काही हरकत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. तसेच स्थानिक पातळीवर तडजोडी होतात, कराव्या लागतात, असे ते म्हणाले.

राजू पाटील यांच्याकडून शिवशक्ती आघाडीची घोषणा, बाळा नांदगावकर म्हणाले...

मनसेने एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर आमचे माजी आमदार राजू पाटील यांनी तसा निर्णय घेतला आहे. काही वेळा पक्ष म्हणून तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. स्थानिक पातळीवर अशा युती आघाडी होत असतात, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
advertisement
महापालिका निवडणुकीत ज्या पक्षावर प्रखर टीका केली, त्यांच्या धोरणांची चिरफाड केली, त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाकडून पक्षशिस्त भंगाची कारवाई होणार आहे का? असे विचारले असता, हा सर्वस्वी पक्षप्रमुखांचा निर्णय आहे, असे नांदगावकर म्हणाले.

राजू पाटील काय म्हणाले?

स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असे राज ठाकरे यांचे आदेश होते. त्यानुसार आम्ही कल्याण डोंबिवलीत शिवशक्ती आघाडी स्थापन केली आहे. सत्तेत असल्यानंतर कामे होतात. बाहेर राहून जनतेची कामे झाली नसती. काही वेळा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतात, असे मनसेचे माजी आमदार राजू पाटील म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मनसे-एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र, बाळा नांदगावकर यांची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement