ज्यांच्यावर १४ लाखांचं बक्षीस तेच ४ माओवादी ठार, SP निलोत्पल यांची महत्त्वाची माहिती

Last Updated:

Four Naxal Killed: घनदाट जंगलात तब्बल 48 तास राबवलेल्या या अभियानात आठ तास माओवाद्यांसोबत जवानांनी प्रत्यक्ष झुंज दिली.

नीलोत्पल (जिल्हा पोलीस अधीक्षक)
नीलोत्पल (जिल्हा पोलीस अधीक्षक)
महेश तिवारी, प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले होते. तब्बल 48 तास गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या या अभियानात ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर 14 लाख रुपये बक्षीस असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी काही वेळा पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
या मोहीमेत तब्बल साडेपाचशे सी सिक्सटी कमांडोच्या जवानांनी भाग घेत भर पावसात नदीनाले पार करत 50 किलोमीटरचा येण्या-जाण्याचा पायी प्रवास केला. यासाठी घनदाट जंगलात तब्बल 48 तास राबवलेल्या या अभियानात आठ तास माओवाद्यांसोबत जवानांनी प्रत्यक्ष झुंज दिली. त्यात कंपनी दलम 10 च्या पीपीएससीएम पदावर असलेले मालू पदा यासह कंपनी दहामध्ये असलेल्या सदस्य क्रांती उर्फ जमुना आणि अहेरी दलमच्या ज्योती कुंजाम आणि गट्टा दलमच्या मगी मडकाम यांचा मृतक माओवाद्यांमध्ये समावेश आहे.
advertisement
या चारही माओवाद्यांवर १४ लाख रुपयांचे बक्षीस होते. या चकमकीत एक एसएलआर दोन इंसास आणि एक थ्री नाट थ्री या तीन बंदुकांसह ९२ जिवंत काडतुसे आणि वॉकीटॉकी जप्त करण्यात आली आहे.
जवळपास साडेपाचशे कमांडो आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले होते. जवळपास १० डोंगर चढून उतरून जवानांना ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करायला लागले. २७ तारखेच्या सकाळी पोलिसांनी जंगलात जाऊन ऑपरेशन सुरू केले. आठ तास माओवाद्यांसोबत जवानांनी प्रत्यक्ष झुंज दिली. या मोहीमेत चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आम्हाला यश आले, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्यांच्यावर १४ लाखांचं बक्षीस तेच ४ माओवादी ठार, SP निलोत्पल यांची महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement