गडचिरोलीत पावसाचा हाहाकार; भामरागडचा संपर्क तुटला, बाजारपेठ बुडाली
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला असून, बचाव कार्य सुरू झालं आहे.
गडचिरोली, महेश तिवारी, प्रतिनिधी : छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून, शंभर गावांना या पुराचा मोठा फटका बसा आहे. पुराचे पाणी आता भामरागड गावात शिरलं आहे. भामरागडमध्ये पुराचं पाणी वाढत असून, बाचावकार्याला सुरुवात झाली आहे.
दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे, या भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. इंद्रावती आणि पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुराचा मोठा फटका हा भामरागड तालुक्याला बसला आहे. भामरागडचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी गावात चौकाच्या पलीकडे गेले असून, बाजारपेठ ही पाण्यात बुडाली आहे. याचा मोठा फटका हा तेथील नागरिकांना बसला आहे.
advertisement
बचाव कार्याला सुरुवात
छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून, शंभर गावांना या पुराचा मोठा फटका बसा आहे. पुराचं पाणी भामरागड गावात शिरलं आहे. बाजारपेठ बुडाली आहे. प्रशासनानं आता या ठिकाणी बचाव कार्य सुरू केले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
Location :
Gadchiroli,Gadchiroli,Maharashtra
First Published :
Sep 09, 2024 12:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
गडचिरोलीत पावसाचा हाहाकार; भामरागडचा संपर्क तुटला, बाजारपेठ बुडाली







