महाराष्ट्राला लाजवणारं दृश्य; पूल नसल्यामुळे मृतदेह खाटेवर, खाट खांद्यावर आणि.....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पहायला मिळतेय. त्यामुळे अजूनही बऱ्याच लोकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतोय.
महेश तिवारी, गडचिरोली, 12 ऑक्टोबर : बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पहायला मिळतेय. त्यामुळे अजूनही बऱ्याच लोकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतोय. काही ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत तर कुठे पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी पूल नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये नदी ओलांडण्यासाठी पूल नसल्यामुळे नागरिकांना मृतदेहही भरलेल्या नदीतून खांद्यावर न्यावा लागला. समोर आलेली ही घटना गडचिरोली मधील आहे.
गडचिरोली जिह्यात पूल नसलेल्या नाल्याला पूर आल्यानं मृतदेह खाटेवर ठेवून भरलेल्या नाल्यातून गावी अंत्यसंस्कारासाठी न्यावं लागल्याचा प्रकार घडलाय. भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गुंडेनुर येथील 50 वर्षीय काटिया करिया पुंगाटी हे आजारी पडल्यानं त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान हा त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना घरी नेण्यासाठी नातेवाईकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागलं.
advertisement
मृतदेह खाटेवर, खाट खांद्यावर; नदीला पूल नसल्यामुळे मृतदेह नेण्यास अडचण, गडचिरोलीतील घटना #gadchiroli #news18marathi pic.twitter.com/VXeTfiED0J
— News18Lokmat (@News18lokmat) October 12, 2023
रुग्णालयापासून गुंडेनुरनाल्या पर्यंत सदर शव ट्रॅक्टर ने नेण्यात आलं. गुंडेनूर नाल्यावर पुल नसल्यानं काही नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून
advertisement
ती खाट आपल्या खांद्यावर घेऊन नाला पार केला. याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदी आलांडण्यासाठी पूल नाही. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून नदी पार केली. हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 12, 2023 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
महाराष्ट्राला लाजवणारं दृश्य; पूल नसल्यामुळे मृतदेह खाटेवर, खाट खांद्यावर आणि.....









