advertisement

कपडे धुण्यासाठी गेली ती पुन्हा आलीच नाही... मोरगावच्या तरुणीसोबत काय घडलं?

Last Updated:

घटनेची माहिती मिळताच इटियाडोह प्रशासनाने तात्काळ कालव्याचा पाणीपुरवठा बंद करून शोधमोहीम सुरू केली आहे.

पायल शहारे (मृत तरुणी)
पायल शहारे (मृत तरुणी)
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा पाय घसरून धरणाच्या कालव्यात पडून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पायल वामन शहारे (वय २० वर्ष) रा. मोरगाव असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे.

कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेली होती...

पायल शहारे ही कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेली असता कपडे धुताना तिचा पाय घसरला आणि ती थेट धरणाच्या कालव्यात बुडाली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे ती क्षणार्धात वाहून गेली.

पाणीपुरवठा बंद करून शोधमोहीम सुरू पण...

घटनेची माहिती मिळताच इटियाडोह प्रशासनाने तात्काळ कालव्याचा पाणीपुरवठा बंद करून शोधमोहीम सुरू केली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तरुणीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
advertisement

ग्रामपंचायतीने पाणघाटाची व्यवस्थाच केली नाही, ग्रामस्थांचा आरोप, गावावर शोककळा

दरम्यान, सुरक्षित पाणघाटाची व्यवस्था ग्रामपंचायतीने न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कपडे धुण्यासाठी गेली ती पुन्हा आलीच नाही... मोरगावच्या तरुणीसोबत काय घडलं?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement