जंगली डुक्करासाठी लावला सापळा, शिकाऱ्याचीच झाली शिकार; सहकाऱ्यांनी केली बेपत्ता असल्याची तक्रार
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जंगली डुक्कराच्या शिकारीवेळी शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार कोणाला समजू नये म्हणून सहकाऱ्यांनी मृतदेह इतरत्र लपवून ठेवत तो बेपत्ता झाल्याचा बनावही रचला होता.
रवी सपाटे, गोंदिया, 05 ऑगस्ट : जंगली डुक्कराच्या शिकारीला लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक करंटचा शॉक बसून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार कोणाला समजू नये म्हणून मृतदेह इतरत्र लपवून ठेवत तो बेपत्ता झाल्याचा बनावही रचला होता. या प्रकरणी मृत अशोक कोहळे याच्या मामाला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्यात मानेगाव इथं ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अशोक मडावी, वय २६ वर्षे, दुर्गेश बिहारी, वय ३५ वर्ष, राधेश्याम देवराम ठाकरे, वय ४० वर्षे व मृतक अशोक कोहळे, रा. मानेगाव, ता. यांनी जंगली डुकरे मारण्याकरीता पांडेबाईच्या शेतात खुंट्या गाडून त्यावर सेन्ट्रिंगचे तार लावले. यानंतर इलेक्ट्रिक पोलच्या ताराला वायरने जोडून पांडेबाईच्या शेतापर्यंत गेलेल्या वायरला वायर जोडल्या. यात सेन्ट्रिंगचे तारामध्ये विद्युत प्रवाह सुरु केले.
advertisement
जंगली डुकरचा शिकार करण्यासाठी त्यांनी लावलेल्या करंट मध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जावू शकतो हे माहित असतानासुध्दा त्यांनी करंट लावल्याने त्यामध्ये आकाश राजेश कोहळे याला विद्युत करंट लागून तो मरण पावला. ही बाब लपवण्यासाठी कोणाला सांगितले नव्हती या प्रकरणी मृतक अशोक कोहळे यांच्या मामाने अशोक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती, यात आमगाव पोलिसांनी तपास करून एका आरोपीला अटक केली.
advertisement
शॉक लागून अशोकचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अशोक मडावी, दुर्गेश बिहारी, राधेश्याम ठाकरे यांनी सेन्ट्रिंग तार व वायर फेकून दिले. मृतकचे शरीर महादेव पहाडी गडमाता मंदीराच्या मागे इलेक्ट्रिक पोल जवळील सागाच्या झाडा मध्ये ठेवून पळून गेले. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी तपास करून एका आरोपीला अटक केली आहे आणि दोन आरोपी सध्या फरार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 05, 2023 11:02 AM IST
मराठी बातम्या/गोंदिया/
जंगली डुक्करासाठी लावला सापळा, शिकाऱ्याचीच झाली शिकार; सहकाऱ्यांनी केली बेपत्ता असल्याची तक्रार









