Nitin Desai : नितीन देसाईंच्या पत्नीने केले गंभीर आरोप, फायनान्स कंपनीने दिलं स्पष्टीकरण

Last Updated:

फायनान्स कंपनीसह अधिकाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकल्याने नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत केला.

News18
News18
मुंबई, 05 ऑगस्ट : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी नेहा यांनी फायनान्स कंपनी एडलवाईस विरोधात तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीसह अधिकाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकल्याने नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत केला. तर या प्रकरणी एडलवाईस कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.
फायनान्स कंपनीने म्हटलं की, नितीन देसाई यांच्या  कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी २०१६ आणि २०१८ मध्ये कर्ज दिलं होतं. पण २०२० नंतर कंपनी आर्थिक अडचणीत सापडली. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले गेले पण त्यात यश आलं नाही. शेवटी NCLT न्यायालयाने या प्रकरणी प्रशासक नेमला.
आमच्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केलेल नाही. सर्व प्रक्रिया कायद्यानुसार करण्यात आली. व्याजदार जास्त आकरण्यात आलेला नाही. शिवाय कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारावर अनावश्यक दबावही टाकलेला नाही. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू असंही एडलवाईस कंपनीने निवेदनात म्हटलंय.
advertisement
एफआयआरमध्ये काय म्हटलंय?
नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. हाच स्टुडिओ हडपण्यासाठी Edelweiss फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेगवेगळी आश्वासने दिली. मोठं कर्ज दिलं, पण कोरोना काळात सगळा व्यवसाय ठप्प होता. त्यावेळी कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकला गेला असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटलं. नितीन देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्येही Edelweiss कंपनीच्या लोकांची नावे घेतली आहे.
advertisement
फायनान्स कंपनीला आमच्या स्टुडिओत गुंतवणूकदार येऊ द्यायचे नव्हते. आमची मालमत्ता बळकावायची होती असं हेतू दिसत होता. त्यामुळेच माझे पती मानसिक दडपणाखाली होते. मी त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला होता असंही नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसंच न्यायालयाने प्रशासक म्हणून नेमलेल्या जितेंद्र कोठारी यांचाही फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरून स्टुडिओ ताब्या घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन देसाईंच्या पत्नीने केला आहे. पाचही जणांनी कर्जाच्या वसुलीसाठी नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिल्याचा आणि या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असं नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटलंय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nitin Desai : नितीन देसाईंच्या पत्नीने केले गंभीर आरोप, फायनान्स कंपनीने दिलं स्पष्टीकरण
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement