Pune News : हडपसरचा सोमनाथ काशीद किनारी बेपत्ता, शोध घेतल्यावर समोर आली काळजाचा थरकाप उडवणारी बातमी

Last Updated:

Pune Tourist Drowned At Kashid Beach : काशीद समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पुणे-हडपसर येथील 24 वर्षीय सोमनाथ भोसले याचा पोहताना बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात ओढला गेल्याची माहिती आहे.

News18
News18
पुणे : काशीद समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पुण्यातील तरुण पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे काशीद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटनाचा आनंद ठरला शेवटचा
मृत तरुणाचे नाव सोमनाथ राजेंद्र भोसले (वय 24) असे असून तो मूळचा शिर्डी येथील रहिवासी होता. सध्या तो पुण्याच्या हडपसर परिसरात वास्तव्यास होता. सोमनाथ मित्रांसोबत पर्यटनासाठी काशीद समुद्रकिनारी आला होता. रविवारी दुपारी मित्रांसमवेत तो समुद्रात पोहण्यासाठी गेला.
पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने सोमनाथ खोल पाण्यात ओढला गेला. समुद्राच्या लाटांचा जोर अधिक असल्याने तो स्वतःला वाचवू शकला नाही. त्याच्या मदतीसाठी मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत सोमनाथ पाण्यात बुडाला होता.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सोमनाथला तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर सोमनाथच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : हडपसरचा सोमनाथ काशीद किनारी बेपत्ता, शोध घेतल्यावर समोर आली काळजाचा थरकाप उडवणारी बातमी
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement