पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर भर दिवसा गोळीबार, अहिल्यानगरमध्ये खळबळ
- Reported by:Harish Dimote
- Published by:Sachin S
Last Updated:
2023 पासून जहागीरदार जामिनावर बाहेर आहे. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी बंटी जहागीरदारवर बेछुट गोळीबार केला.
श्रीरामपूर: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीरामपूरमध्ये भरदिवसा एकावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार ज्या व्यक्तीवर करण्यात आला ती 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. मागील काही दिवसांपासून तो जामिनावर होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं ही घटना घडली. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बंटी जहागीरदार हा 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. 2023 पासून जहागीरदार जामिनावर बाहेर आहे. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी बंटी जहागीरदारवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात बंटी जहागीरदार हा जखमी झाला आहे. जखमी बंटी जहागीरदारला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबाराने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार झाल्याने तणावपूर्ण वातावरण आहे. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती आहे.
पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ठाण्यासह शहरात मोठा जमाव जमला आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
view commentsLocation :
Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर भर दिवसा गोळीबार, अहिल्यानगरमध्ये खळबळ










