आजचं हवामान: पश्चिम बंगालच्या खाडीत वारं घोंगावतंय, कोकणासह 11 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather update: महाराष्ट्रात 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज ते रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस राहील.
Weather update: मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतली होती. सात दिवसांच्या बाप्पाला कोकणात निरोप देताना पावसानं मात्र कहर केला. दिवसभर पाऊस सुरू होता. आजपासून पुढचे चार दिवस देखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस असणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तीव्रता अधिक आहे. याशिवाय दोन ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलली आहे. गुजरातमध्ये देखील पुढचे चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज ते रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस राहील. पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस राहणार आहे. मुंबईत मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. विकेण्डला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, सातारा अमरावती, जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. लातूर, धाराशिव, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला नाही. मात्र ढगाळ वातावरणामुळे घामाच्या धारा वाहतील.
advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढचे दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. 40 किमी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्य़ता आहे. सप्टेंबर महिन्यातही सर्वसामान्यपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
साताऱ्यातील कोयना धरणात पाऊस सुरू असल्याने कोयना धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून कोयना नदीपात्रात 15 हजार 700 क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. कोयना धरण परिसरात पश्चिम घाटात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे 1 फूट 6 इंचानी उघडले आहेत.
advertisement
जळगावच्या जामनेरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. दमदार पावसामुळे जामनेर तोंडापूर मध्यम प्रकल्प 100 टक्के भरलं. दरम्यान परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अकोला जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलीय. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली.494 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आलाय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 6:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: पश्चिम बंगालच्या खाडीत वारं घोंगावतंय, कोकणासह 11 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट