Vanchit Aaghadi: 'मार' खाल्ला तरीही निवडणुकीत पडला, वंचितच्या उमेदवाराचं अजब कृत्य समोर

Last Updated:

उमेदवाराला सहानुभूती मिळण्यासाठी हा हल्ल्याचा बनाव केला गेला. मतदानाच्या तोंडावर स्वतः चीच गाडी फोडली.

News18
News18
हिंगोली :  हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर 18 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ल्याची घटना घडली होती. या संदर्भात कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हा हल्ला नसून उमेदवाराला सहानुभूती मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलिसांच्या तपासात आता निष्पन्न झाले आहे. निवडणुकीत सहानभूती मिळवण्यासाठी हा बनाव केल्याचे समोर आले आहे. पोलीसात तपासात बिंग फुटले आहे
समोर आलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड करत मस्के यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी ही मारहाण केली होती. यामध्ये डॉ. दिलीप मस्के यांना दुखापत झाली आहे. कळमनुरी ते हिंगोली रोडवरील लासीना फाटाजवळ रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले. जखमी डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हिंगोली शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते.
advertisement

सहानुभूती मिळण्यासाठी रचला बनाव

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावा, तांत्रिक पुरावा याचे बारकाईने निरीक्षण केले. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासाअंती निष्पन्न झाले आहे की उमेदवाराला सहानुभूती मिळण्यासाठी हा हल्ल्याचा बनाव केला गेला. मतदानाच्या तोंडावर स्वतः चीच गाडी फोडण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वंचितचे पराभूत उमेदवार डॉ. दिलीप मस्के व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
advertisement

अन् बिंग फुटलं

सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांना काही वेगळ्या शंका उपस्थित होत होत्या. शेवटी पुरावे आणि खबऱ्यांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की उमेदवारानेच हे सगळे षडयंत्र रचले आहे. मारहाण झाल्यापासून संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत होतं. तपासाअंती फिर्यादीच आरोपी निघाला आहे. लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे,
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vanchit Aaghadi: 'मार' खाल्ला तरीही निवडणुकीत पडला, वंचितच्या उमेदवाराचं अजब कृत्य समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement