Nanded : कारचा भीषण अपघात, शिक्षक पती-पत्नी जागीच ठार; मुलगा गंभीर जखमी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
हिंगोली ते नांदेड महामार्गावर कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात शिक्षक दाम्पत्य जागीच ठार झाले.
मनिष खरात, हिंगोली, 03 सप्टेंबर : हिंगोली ते नांदेड महामार्गावर कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात शिक्षक दाम्पत्य जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी कळमनुरी शहरानजीक हा अपघात झाला आहे.
याबाबत मिळालेली माहहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात शिवनी फाट्याजवळ कार डिव्हायडरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यानंतर कार तीन चार वेळा पलटी झाली. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. अपघतात कारमधील शिक्षक पती पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलगा कार चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षक दाम्पत्यापैकी पतीचे नाव जयप्रकाश कावरखे आणि मंजुषा कावरखे असं आहे. तर जखमी झालेल्या मुलाचे नाव पराग कावरखे असं आहे. तिघेही नांदेडहून कळमनुरीच्या दिशेने निघाले होते. कळमनुरी इथं त्याचे कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. गाडीचाही अपघातात चक्काचूर झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 03, 2023 11:58 AM IST











