advertisement

HSRP number plate बसवण्यासाठी यापुढे मुदतवाढ नाही, थेट होणार कारवाई!

Last Updated:

वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. वेळेत प्लेट बसवून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
वाहनधारकांनो लक्ष द्या! तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात येणार नाही. तुमच्याकडे केवळ १० दिवस शिल्लक आहेत. ही शेवटची संधी असणार आहे. परिवहन विभागाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिकांना मुदत दिली आहे. पण यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवून घ्या, अन्यथा थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
मुदतवाढीमागे नेमकी कारणे काय?
यापूर्वी एप्रिल अखेर त्यानंतर जून अखेर आणि आता 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेला हवा तसा वेग मिळालेला नाही. कोट्यवधी वाहनांसाठी प्लेट्सची मर्यादित उपलब्धता, ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील प्रचंड गर्दी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या मर्यादा, यामुळे अनेकांना नंबर प्लेट बसवण्यात अडचणी येत होत्या. काही ठिकाणी प्लेट्स मिळण्यास उशीर होत होता, तर काहींना ऑनलाइन नोंदणी करतानाही त्रास सहन करावा लागला. या सर्व अडचणींमुळेच ही तिसरी आणि अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
advertisement
HSRP कोणाला बंधनकारक?
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. यापूर्वी ३० एप्रिल २०२५ आणि नंतर ३० जून २०२५ अशा दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता ती १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
कशी कराल नोंदणी?
वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटवर किंवा परिवहन विभागाच्या संबंधित पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. त्यानंतर जवळच्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर जाऊन HSRP बसवून घ्यावी. परिवहन विभागाने वाहनचालकांना आवाहन केले आहे की, शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी.
advertisement
१५ ऑगस्टनंतर काय? थेट कारवाई!
परिवहन आयुक्तांनी हे स्पष्ट केले आहे की, १५ ऑगस्ट २०२५ नंतर ज्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर वायुवेग पथकाद्वारे थेट दंडात्मक कारवाई केली जाईल. मात्र, ज्या वाहनधारकांनी १५ ऑगस्टपूर्वी HSRP साठी नोंदणी केली आहे आणि ज्यांना १५ ऑगस्टनंतरची अपॉइंटमेंट मिळाली आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. मात्र ज्यांनी या पैकी काहीच घेतलं नाही त्यांना 10 हजार रुपये दंड लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
HSRP number plate बसवण्यासाठी यापुढे मुदतवाढ नाही, थेट होणार कारवाई!
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement