T20 World Cup : पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार? सर्वात मोठी ताकदच घात करणार, लाहोरच तिकीट कन्फर्म
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानचा न्यूझीलंड विरूद्धचा सामना हा आर प्रेमदासा स्टेडिअवर रंगणार आहे.तर उरलेले इंग्लंड आणि श्रीलंका विरूद्धचे दोन सामने हे श्रीलंकेच्या पल्लीकेले मैदानावर रंगणार आहे. या पिचवर पाकिस्तान पहिल्यांदाच वर्ल्ड कपचा सामना खेळणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पाकिस्तान आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये सहा स्पिनर आणि एक फास्टर बॉलर या रणनितीने मैदानात उतरत आली आहे. त्यातल्या त्यात त्याचा अनुभवी शाहिन आफ्रीदी विकेट काढण्यात अपयशी ठरतोच आहे, त्यासोबत धावा प्रचंड लूटतो आहे. भारता विरूद्धच्या या खराब कामगिरिमुळे त्याला नामिबिया विरूद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
advertisement
शाहिन आफ्रिदीचे वर्ल्ड कपमधील आकडे बघायला गेले तर त्याने नेदरलँड विरूद्ध 3 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन एक विकेट काढली होती.तर सलमान मिर्झाने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 3 विकेट काढल्या होत्या. त्यानंतर युएसएने आफ्रीदीची धुलाई केली होती.त्याला 4 ओव्हरमध्ये 42 धावा ठोकल्या होत्या. तर एक विकेट मिळाली होती.भारताविरूद्ध शाहिनला 2 ओव्हरमध्ये 31 धावा ठोकल्या होत्या. त्यात त्याने एक विकेट काढली होती.
advertisement
advertisement
advertisement
पाकिस्तान आतापर्यंत मोहम्मद नवाज,अबरार अहमद, शादाब खान, मिस्ट्री स्पिनर उस्मान तारीक, कॅप्टन सलमान आगा आणि सैम अयुब या सहा स्पिनरचा वर्ल्ड कपमध्ये वापर करत आली आहे.यातले काही गोलंदाज विकेट काढण्यात यशस्वी देखील ठरले आहे. पण पल्लीकेलेचे मैदान हे स्पिनर गोलंदाजांसाठी अनुकूल नसल्या कारणाने पाकिस्तानाचा सूपर 8 मध्ये घात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाकिस्तानच सूपर 8 मध्येच लाहोरच तिकीट कन्फर्म वाटतंय.









