advertisement

एकच हृदय कितीवेळा जिंकणार...! निक जोनसने घातलंय प्रियांका चोप्राच्या नावाचं मंगळसूत्र, VIDEO पाहून भारतीय फॅन्स झाले वेडे

Last Updated:

Nick Jonas Priyanka Chopra: निकने प्रियांका चोप्राच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये निकच्या हातातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

News18
News18
मुंबई : बॉलीवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस हे जागतिक स्तरावर सर्वात लाडकं जोडपं मानलं जातं. निक आपल्या पत्नीवर किती प्रेम करतो आणि तिच्या संस्कृतीचा किती आदर करतो, हे तर वेगळं सांगायला नको. मात्र नुकतंच निकने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामधून या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. प्रियांकाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द ब्लफ' (The Bluff) आज अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला असून, निकने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये निकच्या हातातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आणि ती गोष्ट म्हणजे प्रियांकाचं मंगळसूत्र.
निक जोनसने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तो प्रियांकाच्या चित्रपटातील पात्रापासून प्रेरित होऊन एक कॉकटेल बनवताना दिसतोय. यावेळी जेव्हा त्याने कॅमेऱ्यासमोर हात केले, तेव्हा नेटकऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून एक गोष्ट सुटली नाही. निकने प्रियांकाचं मंगळसूत्र स्वतःच्या हातामध्ये एखाद्या ब्रेसलेटसारखं गुंडाळलं होतं.

निक जीजूंनी पुन्हा एकदा जिंकलं भारतीय चाहत्यांचं मन

केवळ या व्हिडिओमध्येच नाही, तर चित्रपटाच्या प्रीमियरवेळी रेड कार्पेटवरही निकच्या हातात हे मंगळसूत्र-कम-ब्रेसलेट दिसून आलं होतं. निकचा हा अंदाज पाहून भारतीय चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलं, "निक जीजू फक्त 'ग्रीन फ्लॅग' नाही तर पूर्ण 'ग्रीन फॉरेस्ट' आहेत." तर दुसऱ्याने लिहिलं, "भारतीय संस्कृतीचा इतका मान राखणारा परदेशी जावई मिळणं भाग्याचं आहे."
advertisement












View this post on Instagram























A post shared by Nick Jonas (@nickjonas)



advertisement
व्हिडिओमध्ये निक म्हणतोय, "मित्रांनो, आज प्रियांकाचा 'द ब्लफ' रिलीज झालाय. ही फिल्म इतकी कमाल आहे की मी ती दोनदा पाहिली आहे. तिच्या पात्राचं नाव 'ब्लडी मॅरी' आहे, म्हणून मी आज खास ड्रिंक बनवणार आहे." निकने मोठ्या उत्साहाने कॉकटेल बनवलं आणि त्यात प्रियांकाच्या पात्राच्या स्वभावाप्रमाणे बरंच तिखट टॅबास्को सॉस मिसळलं. हे ड्रिंक जेव्हा त्याने प्रियांकाला दिलं, तेव्हा तिनेही आनंदाने दाद देत निकच्या रेसिपीचं कौतुक केलं.
advertisement

काय आहे 'द ब्लफ'ची स्टोरी?

प्रियांका चोप्रा या चित्रपटात एका अत्यंत वेगळ्या रूपात दिसत आहे. १९ व्या शतकातील कॅरिबियन पार्श्वभूमी असलेल्या या 'अ‍ॅक्शन-थ्रिलर' चित्रपटात प्रियांकाने 'ब्लडी मॅरी' नावाच्या एका माजी चाचे राणीची (Pirate Queen) भूमिका साकारली आहे. आपल्या हिंसक भूतकाळाला मागे सोडून कुटुंबासोबत शांततेत जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीला पुन्हा एकदा संकटांचा सामना कसा करावा लागतो, याची ही थरारक गोष्ट आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकच हृदय कितीवेळा जिंकणार...! निक जोनसने घातलंय प्रियांका चोप्राच्या नावाचं मंगळसूत्र, VIDEO पाहून भारतीय फॅन्स झाले वेडे
Next Article
advertisement
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार, 'महा-धमाका' होण्याचे संकेत; बातमीने संपूर्ण जगाचे धाबे दणाणले
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार,महा-धमाक्याचे संकेत; बातमीने संपूर्ण धाबे दणाणले
  • 72 तासांत सोन्याचे चित्र पालटणार

  • नवा आकडा पाहून बसेल धक्का

  • भाव असा काही वाढणार की खरेदी करणं होईल केवळ स्वप्न

View All
advertisement