advertisement

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या शाही स्नेभोजनाला PM मोदींकडून खास महाराष्ट्रीयन मेनू, आमटी आणि उकडीचे मोदक

Last Updated:

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मॅन्युएल मॅक्रॉन दोन दिवस मुंबईमध्ये आाले होते. यावेळी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

News18
News18
मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मॅन्युएल मॅक्रॉन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांच्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध अशा ताज हॉटेलमघ्ये शाही स्नेभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेभोजनामध्ये अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाची मेजवानी पाहण्यास मिळाली होती. खास करून कोथिंबीर वडी आणि झणझणीत आमटीच्या भाजीचा बेत होता.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मॅन्युएल मॅक्रॉन दोन दिवस मुंबईमध्ये आाले होते. यावेळी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी ताज हॉटेलमध्ये शाही स्नेभोजन आयोजित केलं होतं. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे मेनू सुद्धा महाराष्ट्रायीन पद्धतीचा होता. यामध्ये  उकडीचे मोदक, डाळ आमटी आणि मसाला भात या सारख्या महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. तसंच  कोथिंबीर वडी आणि बासुंदी असे पदार्थ सुद्धा होते.
advertisement
या स्नेभोजनामध्ये फक्त महाराष्ट्रीयनच नाहीतर भारतातील वेगवेगळ्या भागातील खाद्य पदार्थांचाही समावेश होता. यामध्ये  'फ्यूजन मिलेट साब्ले ब्रिटन' 'जर्दाळू सली वांगण' आणि 'पनीर जयपुरी मटार आणि नाचणीचा पदार्थांचा देखील समावेश होता.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मॅक्रॉन यांचाा हा दौरा महत्त्वाचा होता.  मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्याा या स्नेहभोजनालाा दोन्ही देशांतील महत्त्वाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
advertisement
पंतप्रधान मोदी मॅक्रॉन यांच्या दौऱ्याबद्दल काय म्हणाले? 
"भारताच्या वेगवान प्रगतीला आणि मोठ्या प्रमाणावरील क्षमतेला जेव्हा फ्रान्सची ताकद साथ देते, तेव्हा जगासाठी नवे संधीमार्ग खुलतात.  परस्परांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देत दोन्ही देश एकमेकांचे मनापासून स्वागत करत आहेत. 2030 पर्यंत 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय फ्रान्सने निश्चित केले आहे. युवा शक्ती आणि तरुण बुद्धिमत्तेचा सुंदर मेळ घालण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे. वर्ष 2026 हे भारत–फ्रान्स संबंधांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. या वर्षात लोकांमधील परस्पर संवाद आणि देवाणघेवाण अधिक दृढ होईल, तसंच उद्योग भागीदारीचा विस्तार होईल. आज ज्या प्रकारे आपण भारतात एकत्र आलो आहोत, त्याचप्रमाणे जून 2026 मध्ये फ्रान्समध्ये ‘भारत इनोव्हेट्स 2026’ या उपक्रमांतर्गत भारतातील सर्वोत्तम तंत्रज्ञान-आधारित स्टार्टअप्स जगासमोर सादर करण्यात येतील. ही स्टार्टअप्स आरोग्य, हवामान आणि सुरक्षा यांसारख्या जागतिक आव्हानांवर उपाय विकसित करत आहेत. फ्रान्स तसंच जगभरातील नेते, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि विद्यापीठांना मनःपूर्वक आमंत्रित करतो' असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या शाही स्नेभोजनाला PM मोदींकडून खास महाराष्ट्रीयन मेनू, आमटी आणि उकडीचे मोदक
Next Article
advertisement
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार, 'महा-धमाका' होण्याचे संकेत; बातमीने संपूर्ण जगाचे धाबे दणाणले
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार,महा-धमाक्याचे संकेत; बातमीने संपूर्ण धाबे दणाणले
  • 72 तासांत सोन्याचे चित्र पालटणार

  • नवा आकडा पाहून बसेल धक्का

  • भाव असा काही वाढणार की खरेदी करणं होईल केवळ स्वप्न

View All
advertisement