Joints pain : वयाच्या तिशीतच सांधेदुखी ? ऐन तारुण्यात येणाऱ्या दुखण्यांना ठेवा लांब, जीवनशैलीत करा महत्त्वाचे बदल
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
ऐन तारुण्यात संधीवातासारख्या व्याधी का जाणवतात समजून घेऊया. हा बदल अचानक झालेला नाही किंवा होत नाही. आपली बदलती जीवनशैली, कामाच्या सवयी आणि आपल्या शरीराकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळे लहान वयातच ही समस्या वाढली आहे. दुर्लक्ष केले तर ही किरकोळ वेदना नंतर मोठी समस्या बनू शकते.
मुंबई : गुडघे दुखणं, पायऱ्या चढताना वेदना होणं किंवा पाठीला वाक येणं ही लक्षणं वृद्धापकाळाची मानली जात होती, पण आजचं चित्र तसं नाही.
सांधेदुखी केवळ वयाच्या साठी किंवा सत्तरीच्या टप्प्यातच जाणवते असं अनेकदा मानलं जातं. पण, आता, वीस ते तीस वयोगटातील तरुणांनाही गुडघे, पाठ, मान आणि खांदे दुखण्याचा त्रास जाणवायला सुरुवात झाली आहे. अनेकांना जागं झाल्यावर जडपणा जाणवतो, थोडा वेळ बसल्यानंतर उभं राहायला त्रास होतो किंवा हलक्या व्यायामानंतरही सांधेदुखीचा जाणवते.
ऐन तारुण्यात संधीवातासारख्या व्याधी का जाणवतात समजून घेऊया. हा बदल अचानक झालेला नाही किंवा होत नाही. आपली बदलती जीवनशैली, कामाच्या सवयी आणि आपल्या शरीराकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळे लहान वयातच ही समस्या वाढली आहे. दुर्लक्ष केले तर ही किरकोळ वेदना नंतर मोठी समस्या बनू शकते.
advertisement
तरुणांमध्ये सांधेदुखी वाढण्याची मुख्य कारणं काय आहेत पाहूया -
- बैठी जीवनशैली - सध्या अनेकांचं कामाचं स्वरुप बैठ असतं. लॅपटॉप आणि मोबाईल फोनचा वापर जास्त होतो. तासन्तास बसून राहणं, मर्यादित हालचाल करणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात. स्नायू कमकुवत असतात तेव्हा सांध्यांवर जास्त दबाव येतो.
advertisement
- शरीराची चुकीची स्थिती - कुबड काढून बसणं, मान खाली ठेवून मोबाईल फोनकडे पाहणं किंवा बराच वेळ त्याच स्थितीत बसणं यामुळे मान, खांदे आणि पाठीच्या सांध्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- चुकीचा किंवा जास्त व्यायाम - व्यायाम फायदेशीर आहे, पण चुकीच्या पद्धतीनं व्यायाम केला तर दुखापत होऊ शकते. अचानक जड वजन उचलणं, वॉर्म अप न करणं किंवा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय कठोर व्यायाम केल्यानं सांध्यांचं नुकसान होऊ शकतं.
advertisement
- कमकुवत स्नायू - पोटाचे आणि पाठीचे स्नायू हे मुख्य स्नायू शरीराला आधार देतात. कमकुवतपणामुळे गुडघे आणि कंबरेवर अतिरिक्त दबाव येतो.
- वेदनांकडे दुर्लक्ष करणे - वेदना जाणवतात तेव्हा आपोआप किंवा स्वतःहून बरं होईल असं अनेक तरुणांना वाटतं पण, वारंवार होणाऱ्या वेदना म्हणजे शरीराकडून काहीतरी चुकीचं आहे असा संकेत असू शकतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यानं दीर्घकाळात कायमचं आणि मोठं नुकसान होऊ शकतं.
advertisement
लक्षणं
सकाळी उठल्यावर सांधे कडक होणं, पायऱ्या चढताना किंवा उतरताना गुडघ्यांमधे वेदना होणं, खांदे हलवताना आवाज येणं, बराच वेळ बसल्यानंतर पाठ दुखणं, हलक्या व्यायामानंतरही सूज येणं किंवा वेदना होणं अशी लक्षणं पुन्हा पुन्हा येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.
advertisement
वेदनांचं निदान लवकर झालं तर समस्या वाढण्यापासून रोखता येते. उपचारांना उशीर केल्यानं सांध्याची स्थिती बिघडू शकते आणि उपचार लांबू शकतात. तज्ज्ञांच्या मते, लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे कायमचं नुकसान टाळता येतं.
साधे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय
- दररोज किमान तीस मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं.
- व्यायामापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग करणं. कोअर-स्ट्रेंथनिंग व्यायाम करणं.
advertisement
- सरळ बसा, स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर ठेवा आणि दर तीस-चाळीस मिनिटांनी ब्रेक घ्या.
- जास्त वजनामुळे गुडघ्यांवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे वेदना वाढू शकतात.
- सांध्यालाही विश्रांतीची आवश्यकता असते. सततच्या श्रमानंतर शरीराला बरं होण्यासाठी वेळ द्या.
- वेदना बराच काळ चालू राहिल्या तर ऑर्थोपेडिक तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 10:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Joints pain : वयाच्या तिशीतच सांधेदुखी ? ऐन तारुण्यात येणाऱ्या दुखण्यांना ठेवा लांब, जीवनशैलीत करा महत्त्वाचे बदल








