advertisement

आखाड्यात शिरून तोंडावर....,पैलवान सिकंदर शेखला मारहाणाची खरा VIDEO समोर, 'रडका मुळशी पॅटर्न'!

Last Updated:

माऊली कोकाटे याने सिंकदर शेखच्या मानेवर हात मारला. त्यामुळे हात मारण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही मल्लांमध्ये वाद निर्माण झाला.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: कुस्तीच्या मैदानात या ना त्या कारणामुळे वाद हे नवे नाही. अशात पुण्यातील मुळशी इथं झालेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी राहिलेल्या पैलवान सिकंदर शेखवर आखाड्यातच हात उचलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आधी समोरील पैलवानाने हात उचलला आणि नंतर त्याच्या समर्थकाने येऊन सिकंदर शेख याच्या तोंडावर बुक्का मारला, या प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
advertisement
महाशिवरात्री उत्सवानिमित्त मुळशीतील पौड गावात भव्य कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचा आघाडीचा मल्ल सिकंदर शेख आणि तगडा प्रतिस्पर्धी माऊली कोकाटे यांच्यात तब्बल ११ लाखांची कुस्ती रंगली होती. कुस्तीचे पंच  आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोहिदास आप्पा हे होते. तासभर दोन्ही मल्लांनी दमदार झुंज दिली पण निकाल लागत नव्हता.
advertisement
तर आयोजकांकडून कुस्ती निकाली लागल्याशिवाय थांबवली जाणार नाही, अशा घोषणा केल्या जात होत्या. दरम्यान माऊली कोकाटे याने सिकंदर शेखच्या मानेवर हात मारला. त्यामुळे हात मारण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही मल्लांमध्ये वाद निर्माण झाला. दोन्ही मल्लं आमने-सामने आले. सिंकदर शेख कोकाटेला बजावत होता.
पण, इतक्यात मैदानाबाहेरून अचानक आलेल्या माऊली कोकाटेच्या समर्थकाने सिकंदर शेखच्या तोंडावर चापट मारली. मारहाणीचा हा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा कैद झाला आहे.
advertisement
या घटनेमुळे मैदानात एकच गोंधळ उडाला. दोन्ही समर्थकांनी मैदानात उड्या टाकल्या.  शिट्ट्या, आरडाओरडा आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. माऊली कोकाटेचे आणखी काही समर्थक सिकंदर शेखच्या अंगावर धावून गेले होते. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेनंतर आयोजकांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही मल्लांना विजयी घोषित केलं. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट उसळली आहे. सिंकदर शेख याच्यावर हात उचलणाऱ्या तरुणावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आखाड्यात शिरून तोंडावर....,पैलवान सिकंदर शेखला मारहाणाची खरा VIDEO समोर, 'रडका मुळशी पॅटर्न'!
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement