Online Fraud: 'ऑनलाईन टास्क पूर्ण करा लाखो रुपये मिळतील'! कल्याणमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा

Last Updated:

Online Fraud: सुषमा पालकर नावाच्या महिलेने 'ज्यू पीडिया' नावाच्या कंपनीचं कार्यालय थाटलं होतं.

Online Fraud: 'ऑनलाईन टास्क पूर्ण करा लाखो रुपये मिळतील'! कल्याणमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
Online Fraud: 'ऑनलाईन टास्क पूर्ण करा लाखो रुपये मिळतील'! कल्याणमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
कल्याण: सध्याच्या काळात तंत्रज्ञानामध्ये अतिशय वेगानं प्रगती होत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातील आणि कामाच्या ठिकाणी अनेक बाबी सुकर झाल्या आहेत. पण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि लोकांची ऑनलाईन उपस्थिती या बाबी ऑनलाईन घोटाळ्यांच्या वाढीस चालना देत असल्याचं निदर्शनास आलं आहे. कल्याणमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. कल्याणमध्ये 'ज्यू पीडिया' नावाच्या कथित कंपनीने अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणामुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा पालकर नावाच्या महिलेने 'ज्यू पीडिया' नावाच्या कंपनीचं कार्यालय थाटलं होतं. या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन टास्कमध्ये गुंतवणूक करा आणि लाखो रुपये कमवा अशी जाहिरात करण्यात आली. या कंपनीच्या ऑनलाईन ग्रुपमध्ये लिली आणि जॅक अशी दोन नावे दिसत होती. ऑनलाईन टास्कच्या 9 लेव्हल पूर्ण केल्यानंतर लाखोंचा फायदा होईल, असं आमिष अनेक गरजवंतांना दाखवलं गेलं.
advertisement
सुरुवातीला कंपनीने प्रत्येक गुंतवणूकदाराचं वॉलेट तयार केलं. या वॉलेटमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेले पैसे आणि टास्क पूर्ण केल्यानंतर मिळालेला मोबदला दिसत होता. मात्र, अनेक महिने उलटून गेल्यानंतर हे पैसे काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता कंपनीकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरं मिळाली. अखेर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचं लक्ष्यात आलं. त्यांनी कथित सीईओ सुषमा पालकरला गाठलं मात्र तिनेही उडवा उडवीची उत्तरं दिली.
advertisement
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी थेट कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी गर्दी केली याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.‎
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Online Fraud: 'ऑनलाईन टास्क पूर्ण करा लाखो रुपये मिळतील'! कल्याणमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement