'बाईचा नाद सोड', अनैतिक संबंधातून खुन्नस, जळगावातील तरुणाच्या हत्येचं कारण उघड

Last Updated:

जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी येथील एका मंदिराजवळ रविवारी रात्री सागर सोनवणे नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी येथील एका मंदिराजवळ रविवारी रात्री सागर सोनवणे नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने डोक्यावर आणि मानेवर वार करून ही हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी तरुणाचा मृतदेह जखमी अवस्थेत टाकून पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सागरचा खून अनैतिक संबंधांच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. निमखेडी शिवारातीलच एका महिला सोबत सागरचे अनैतिक संबंध होते. यातून आरोपी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर यांचा सागरसोबत वाद सुरू होता. याच जुन्या वादातून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे.
advertisement
अनैतिक संबंधाच्या कारणातून अनिल नन्नवरे व संदीप छगन बाविस्कर यांच्यासोबत सागरचा वारंवार वाद होत होता. रविवारी सायंकाळी आरोपींनी सागरला धमकी दिली होती. संबंधित महिलेचा नाद सोड नाहीतर, तुला जीवे मारेन, अशी धमकी आरोपींनी दिली होती. यानंतर रात्री १० वाजता निमखेडीतील राम मंदिर परिसरात आरोपींनी सागरवर लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला केला.
advertisement
गंभीर जखमी अवस्थेत सागरला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बाईचा नाद सोड', अनैतिक संबंधातून खुन्नस, जळगावातील तरुणाच्या हत्येचं कारण उघड
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंमत किती?
चांदीत ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंम
  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

View All
advertisement