जळगावात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon News: विद्यार्थ्यांच्या मारहाणीत कल्पेशचा मृत्यू झाल्याचा आरोप कल्पेशच्या नातेवाईकांनी केला आहे.
विजय वाघमारे, जळगाव : जळगावात शाळेच्या मैदानावर खेळताना नववीच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालय अर्थात आर आर विद्यालयातील ही घटना आहे.
कल्पेश वाल्मिक इंगळे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कल्पेश हा सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर दुपारच्या सुट्टीत मैदानात विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना अचानक कोसळल्याने कल्पेशला शिक्षकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी कल्पेशचे शाळेत काही विद्यार्थ्यांसोबत वाद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मारहाणीत कल्पेशचा मृत्यू झाल्याचा आरोप कल्पेशच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
advertisement
जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा पालकांनी आणि नातेवाईकांनी घेतला आहे. यामुळे काही वेळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मयत कल्पेशच्या नातेवाईकांनी शाळेत धाव घेत स्वतः सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम केले.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
July 11, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?


