जळगावात Swift Dzire चा भीषण अपघात, माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू; वाहनचालक फरार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला असून या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः धरणगाव शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : धरणगाव तालुक्यातील बोरगावजळ सोमवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात धरणगाव पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा संजय चौधरी यांचे चिरंजीव अविनाश संजय चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला असून या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः धरणगाव शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चौधरी हे सोमवारी दुपारी आपल्या 'स्विफ्ट डिझायर' कारने खासगी कामासाठी एरंडोलच्या दिशेने जात होते. दुपारी साधारण साडेबारा ते एकच्या सुमारास त्यांची कार बोरगाव गावाजवळ आली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चौधरी यांची कार रस्त्याच्या कडेला उलटली. कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून अविनाश यांना छातीला आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
नेमका कसा झाला अपघात?
अपघात घडल्यानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक मदतीसाठी थांबण्याऐवजी घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अविनाश यांना कारबाहेर काढून तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
advertisement
अकाली मृत्यू झाल्याने परिसरावर मोठी शोककळा
अविनाश चौधरी यांच्या निधनाचे वृत्त समजताच जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात धरणगाव येथील नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिभा चौधरी या धरणगावच्या माजी नगराध्यक्षा असल्याने आणि चौधरी कुटुंबाचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. तरुण मुलाचा असा अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चौधरी कुंटुंबावर आभाळ कोसळले आहे.
advertisement
पोलिसांकडून कसून तपास सुरू
धरणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावर वाढती वेगमर्यादा आणि अज्ञात वाहनांची दहशत आता चिंतेचा विषय बनली असून फरार चालकाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 5:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावात Swift Dzire चा भीषण अपघात, माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू; वाहनचालक फरार





