पुण्याहून मतदानाला आलो, पण मतदान केंद्रावर.., जालन्याच्या आनंद सोबत अजब घडलं? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
आज राज्यभर नगरपरिषद निवडणुकीचे रणधुमाळी पाहायला मिळाली. मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे देखील दिसून आले.
जालना : आज राज्यभर नगरपरिषद निवडणुकीचे रणधुमाळी पाहायला मिळाली. मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे देखील दिसून आले. असाच बोगस मतदानाचा प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळाला.
जालन्याच्या अंबड नगरपरिषद निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करण्यासाठी एक तरुण पुण्याहून अंबडमध्ये आला. मात्र मतदान न करताच तो माघारी परतलाय. हा तरुण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्याआधी दुसऱ्याच व्यक्तीने त्याच्या नावावर मतदान केल्याची तक्रार या तरुणाने केली आहे.
आनंद शिंदे असं या तरुणाचं नाव असून प्रभाग क्रमांक 1 वरील बूथ क्रमांक 3 वर या तरुणाचं मतदान झालेलं होतं. त्यामुळे दूरवरून येऊनही मतदान न झाल्यानं हा तरुण निराश झालाय. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने हा तरुण आल्या पावली माघारी फिरला.
advertisement
मी पुण्यावरून मतदान करण्यासाठी आलो होतो. इथे आल्यानंतर माझं मतदान आधीच झाल्याचं समजले. मी मतदान केलेले नसताना माझे मतदान दुसरा व्यक्ती कसा काय करू शकतो? मतदान अधिकाऱ्यांनी कोणत्या कागदपत्रांची पडताळणी केली हे मला कळायला हवे. आता तो मला थांबावयास सांगत आहेत. परंतु, माझ्याकडे तेवढाच वेळ नाही. यापुढे कोणत्याही निवडणुकीत मी कधीच मतदान करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आनंद शिंदे यांनी व्यक्त केलीय.
advertisement
दरम्यान, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या या युवकाची अशा पद्धतीने निराशा झाल्याने त्याचा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासच उडाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
December 02, 2025 9:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
पुण्याहून मतदानाला आलो, पण मतदान केंद्रावर.., जालन्याच्या आनंद सोबत अजब घडलं? Video

