‘आम्हाला जास्त नको रास्त भाव द्या’, जालना-नांदेड मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांमधून विरोध, दिला हा इशारा Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
179 किमी लांबीचा हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग असणार आहे. यासाठी जमिनीची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र जमिनीला मिळत असलेला दर बाजार मूल्यापेक्षा कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी म्हणून मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड असे द्रुतगती मार्गाने जोडण्यात येणार आहे. 179 किमी लांबीचा हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग असणार आहे. यासाठी जमिनीची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र जमिनीला मिळत असलेला दर बाजार मूल्यापेक्षा कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. आमच्या जमिनीला जास्त नाही तर रास्त भाव द्या, अशी मागणी जालना जिल्ह्यातील प्रकल्प बाधित शेतकरी करत आहेत. लोकल 18 च्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या काय मागण्या हे जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
जालना शहरापासून जवळच असलेल्या देव मूर्ती आणि आसपासची गावे ही महानगरपालिकाच्या झालर क्षेत्रात तसेच प्रभाव क्षेत्रामध्ये येतात. या ठिकाणी जमिनीला एक ते दीड कोटी रुपये प्रति एकर अशा पद्धतीचा सध्याचा दर आहे. जमिनींचे झालेले व्यवहार तपासल्यास ही उघडकीस येईल. त्या तुलनेत 20 ते 25 लाख रुपये प्रति एकर हा दर अत्यंत तुटका असून परिसरातील कोणत्याही शेतकऱ्याला या दरात जमिनी महामार्गासाठी देणं परवडणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी या महामार्गात जमिनीच्या होणाऱ्या संपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. प्रशासनाने आमच्या आंदोलनाची आणि मागण्यांची दखल घेतली नाही. 5 फेब्रुवारी रोजी आम्ही सर्व शेतकरी सामूहिकरित्या आत्मदहन करणार आहोत, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.
advertisement
माझी देव मूर्ती शिवारात 32 एकर शेतजमीन आहे. त्यापैकी आमच्या कुटुंबाची साडेचार एकर शेतजमीन या प्रकल्पात जात आहे. जमिनीचे बाजार मूल्य एक ते दीड कोटी रुपये एवढे असताना आमची 20 ते 25 लाख रुपये प्रति एकर याप्रमाणे बोळवण केली जात आहे. हे आमच्यापैकी कोणत्याही शेतकऱ्याला मान्य नाही. या जमिनीचे योग्य दर ठरवण्यासाठी दोन निष्पक्ष अधिकारी, दोन शेतकरी तर दोन सामाजिक कार्यकर्ते यांची समिती तयार करून जमिनीचा दर ठरवण्यात यावा. ही समितीचे दर ठरवेल तो आम्हाला मान्य राहील. आम्हाला जास्त नको तर रास्त मोबदला मिळायला हवा, अशी मागणी प्रकल्प बाधित दिलीप राठी यांनी व्यक्त केली.
advertisement
आज रोजी माळाच्या जमिनीचे भाव देखील 50 ते 60 लाख रुपये प्रति एकर पर्यंत पोहोचले आहेत. आमच्या जमिनी 4-5 लाख रुपये हे करणे आम्ही कशा द्याव्यात? आमच्या जमिनीला सध्या दीड ते दोन कोटी रुपये प्रति एकर असा बाजारभाव मिळत आहे. त्याच पद्धतीचा मोबदला आम्हाला मिळावा, अशी मागणी शेतकरी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement
view comments
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 30, 2025 5:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
‘आम्हाला जास्त नको रास्त भाव द्या’, जालना-नांदेड मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांमधून विरोध, दिला हा इशारा Video










