इराणचे खजूर जालन्यात, शेतकऱ्याने कमावले 8 लाख रुपये, असं केलं नियोजन Video
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
जालना जिल्ह्यातील शेतकरी खजूर शेतीमधून लखपती झालाय. कसा केला शेतकऱ्याने हा प्रयोग पाहुयात.
जालना, 2 ऑगस्ट : शेती क्षेत्रात अनेक आव्हाने असताना देखील प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करतात. असाच एक साहशी प्रयोग जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे. सौदी अरेबिया, इराण सारख्या आखाती देशात पिकाणारे खजूर जालन्यात पिकवून या शेतकऱ्याने तब्बल 8 लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. कसा केला शेतकरी दामोदर शेंडगे यांनी हा प्रयोग पाहुयात.
कशी झाली सुरूवात?
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनेवाडी हे दामोदर शेंडगे यांचे गाव आहे. जिल्ह्यातील परतूर येथील साखर कारखान्यासमोरून जात असताना दामोदर शेंडगे यांनी कारखान्यात सोनेरी गुच्छ झाडे पाहिली. तेव्हा ही कुठली शोभिवंत झाडे याची उत्सुकता त्यांना आल्याने त्यांनी कारखान्यात जाऊन या झाडाबद्दल विचारपूस केली असता ही शोभेची झाडे नसून खजुराची झाडे असल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
advertisement
एकदाच करा लागवड नंतर घरी चालत येईल पैसा, या शेतीचं असं करा नियोजन
खजुराची झाडे जर इथे टिकू शकतात तर मग आपल्या शेतीत लावायला काय हरकत आहे. या विचाराने त्यांनी ही रोपे कुठून आणली याची विचारपूस केली. ती रोपे ज्यांनी दिल्या त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला आपली शेती दाखवली आणि या मातीत हे पीक येईल का असा प्रश्न विचारला. त्या व्यक्तीने इथल्या मातीत छान पीक येईल, असा विश्वास देताच दामोदर शेंडगे यांनी आपल्या मुलांसोबत चर्चा करून खजुराची शेती करायचीच हे ठरवले.
advertisement
इराण वरून विकत आणले रोप
2019 मध्ये त्यांनी रोप इराण वरून विकत आणले. तेव्हा एका रोपाचा भाव होता 3250 प्रती नग होता. आपल्या 3 एकर जमिनीवर 12 ऑक्टोबर 2019 रोजी 25 बाय 25 च्या अंतरावर ही 200 रोपांची लागवड करण्यात आली. त्यावेळेस फक्त शेणखताचा वापर करण्यात आला. वर्षातून 2 वेळेस फक्त शेणखत देण्यात आले. कुठलाही रासायनिक फवारा, कुठलेच खत, औषधाची मात्रा देण्याची गरज पडली नाही.
advertisement
38 महिन्यानंतर या झाडाला मोहर आला. 1 जानेवारी 2023 ला झाडावर फुले आली. फळं यायला सुरुवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही पिकलेली फळे विकण्यासाठी तयार झाली. पीक इतके छान बहरले की फळाच्या पहिल्या बाजारातच एका झाडावर 50 किलो ते 1 क्विंटल इतका माल निघायला लागला. आता दरवर्षी फळांचे प्रमाण वाढतच जाणार असल्याचे दामोदर शेंडगे सांगतात.
advertisement
कसं करतात नियोजन?
आम्ही ही 200 खजुराची झाडे लावून साडेतीन वर्ष झाली. यंदा यापासून आम्हाला चांगलं उत्पादन मिळत आहे. यामध्ये झाडांना तुरे आल्यानंतर पोलन करावे लागते. प्रत्येक 20 झाडामागे 1 नर जातीचे झाड आहे. या नर झाडाचा एक तुरा काढून इतर झाडांच्या तुऱ्यामध्ये ठेवावा लागतो. तेव्हाच उत्तम प्रतीचे खजूर मिळतात, असं दामोदर शेडगे यांचा मुलगा जगदीश शेडगे यांनी सांगितले.
advertisement
8 लाख रुपये उत्पन्न
शेंडगे यांचे शेत रस्त्यावरच असल्याने त्यांनी तिथेच स्टॉल लावून याची विक्री केली. आतापर्यंत काढलेला 4 ते साडे चार टन खजूर त्यांनी 200 प्रतिकिलो भावाने विक्री झाला. या विक्रीतून त्यांना आता पर्यंत 8 लाख रुपये उत्पन्न झाले, असं दामोदर शेंडगे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 02, 2023 8:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
इराणचे खजूर जालन्यात, शेतकऱ्याने कमावले 8 लाख रुपये, असं केलं नियोजन Video